जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक
चंद्रपूर/प्रतिनिधी:
ग्राहकाला घटनेने मुलभूत अधिकार दिलेले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या मुलभूत अधिकार आणि हक्काचे संवर्धन आणि संरक्षण करण्याचे महत्वाचे काम राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समिती करत असते. ग्राहकाने आपल्या मुलभुत हक्काप्रती नेहमी जागरुक राहण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेमध्ये ते बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, राज्यातील धान्याच्या वितरण व्यवस्थेमध्ये आमुलाग्र बदल झाला असून पॉस मशिनमुळे वितरणामध्ये पारदर्शकता आलेली आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये आधार जोडणीचे काम 90 टक्क्यांपर्यत पूर्ण झाले आहे. ग्राहकाला खाद्यपदार्थाच्या आवेष्टानावरील माहिती बाबतीत काही तक्रार असल्यास 9869691666 या व्हाट्सॲप क्रमांकावर तक्रार नोंदवावी. तसेच खाद्यपदार्थ अथवा औषधांच्या बाबतीत काही तक्रार असल्यास 1800222365 या टोल फ्रि क्रमांकावर तक्रार नोंदवावी. ही तक्रार नोंदविल्यानंतर 72 तासांच्या आत त्या तक्रारीवर कारवाई केल्या जात असल्याचे सांगूण ते म्हणाले की, चित्रपटगृहांमध्ये खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास रोखले असता ग्राहकांनी तक्रार करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
यावेळी सदस्य सचिव जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद तथा जिल्हा पुरवठा अधिकारी, राजेंद्र मिस्किन, सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे, जिल्हा ग्राहक संरक्षणाचे सदस्य गिरीधरसिंह बैस, वामनराव नामपल्लीवार, सदाशिव सुकारे तथा धान्य सुरक्षा अधिकरी गिरीष सातकर,जिल्हा ग्राहक संरक्षणाचे सदस्य उपस्थित होते.
शासकीय कार्यालयीन अधिकारी-नागरिकांना अभ्यांगताना भेटत नाहीत प्रश्न गांभीर्याने समजून घेत नाहीत.मराठी भाषेचा वापर नाहीत. अर्जदार-तक्रारकर्ता निवेदन प्रश्रार्थी यांना ये-जा करणारी ग्राहकांनी थांबविण्या बाबत. प्रत्येक क्षेत्रात कार्यालय कडून मराठी भाषेचाच शब्द प्रयोग व्हावा,असे संचालयाने वारंवार सूचना दिल्या असून संवादात इंग्रजी शब्दाचा उच्चार करण्यात येऊ नये. अंमलबजावणीसाठी अभ्यांगतासाठी राखून ठेवलेल्या भेटीच्या कालावधीत अधिकाऱ्यातील त्याचा सूचना फलकावर ठळक पणे प्रदर्शित करावे, असे निवेदन यावेळी जिल्हा ग्राहक संरक्षण सदस्यांनी जिल्हाधिकारी यांनी दिले.
शासन निर्णय क्र.संक्रिर्ण 2018/प्र.क-9/18 मंत्रालय मुंबई 32दिनांक 18 फरवरी 2018अन्वये शासकीय कार्यालयात भेटीचे दिवस आणि वेळ मंत्रालयात दुपारी 2.30 ते 3.30 वेळ जनतेच्या भेटीसाठी राखून ठेवावी व उपविभाग स्तरीय आणि त्यावरील कार्यालयीन अभ्यांगतासाठी सोमवार व शुक्रवार या दोन दिवशी दुपारी 3 ते 5 कालावधी तालुका स्तरीय कार्यालयीन सोमवार बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस वेळ दुपारी 3 ते 5 कालावधी अभ्यांगतासाठी राखून ठेवावे. व अभ्यागतासाठी राखून ठेवालेल्या कालावधीत अधिकाऱ्यांनी शक्यतो दौरा बैठक आयोजित करुन नये, शक्यतो प्रत्येक अभ्यागताचे म्हणणे पुरेशा वेळ देऊन ऐकूण घ्यावे, व त्यांना आवश्यक सहकार्य करावे,असे देखील यावेळी सदस्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट केले.