चंद्रपूर :-
खा. धानोरकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांचे सोबत चर्चा करून कोरोना विषाणूच्या संभाव्य फैलाव्याच्या शक्यतेने व सिंदेवाहीत देखील दोन संशयित रुग्ण आढळल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागातील शाळांना देखील 31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात यावी अशा सूचना खासदार महोदयांनी केल्या. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांना अशा सूचना जारी करून ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी कुणाल खेमनार साहेब, आमदार प्रतिभाताई धानोरकर, रामू तिवारी, गोपाल अमृतकर, संतोष लहामागे आदी मान्यवर उपस्थित होते.
देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले आहे. त्यात चंद्रपुरात देखील संशयित आढळून येत आहे. त्याची खबरदारी म्हणून चंद्रपूर शहरातील शाळा, चित्रपट गृह, जलतरण तलाव, व्यायाम शाळा ह्या बंद करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांनी दिले आहे. परंतु ग्रामीण भागात देखील असे संशयित रुग्ण आढळून येत आहे. त्याची खबरदारी घेत कर्तव्यदक्ष खासदार बाळू धानोरकर यांनी ग्रामीण भागातील ग्रामस्थांची काळजी घेत तेथील शाळादेखील बंद करण्याच्या सूचना जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांना दिल्या आहे.