येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार
येवला: तालुक्यातील आडगाव रेपाळ येथील स्थानिक पाणी योजना विहिरीचे पाणी स्रोत कमी झाल्याने अनेक वर्षापासून अडचणीत होती. जानेवारी पासुनच गावात टैंकर ची मागणी केली जात असे. गेल्या अनेक वर्षापासून टैंकर वर गावकऱ्यांची तहान भागवली जात होती. परिसरात विखरणी, कातरणी, सोमठाने आदि सर्व गावांना 38 गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेतुन पाणीपुरवठा केला जात होता. शेजारी मुरमी गावातही गेल्या 3 वर्षापासून 38 गाव पाणी पुरवठा योजनेतुन पानी पुरवठा केला जात होता. त्यामुळे तालुक्यात सर्वप्रथम टैंकर मागनारे मुरमी टैंकर मुक्त झाले होते. शेजारचे गाव टैंकर मुक्त झाल्याने स्वाभाविक आडगाव ग्रामस्थाची आपले गाव 38 गाव योजनेला जोडले जावे आणि आपल्या गावाला शुद्ध पाणी पुरवठा केला जावा अशी मागणी होती. ग्रामस्थाची मागणी ध्यानात घेऊन 38 गाव योजना उपाध्यक्ष मोहन शेलार यानी प्रयत्न करुण हे गाव 38 गाव योजनेला जोडून दिले. दि. 16 मार्च रोजी उपाध्यक्ष मोहन शेलार यांचे हस्ते जलपुजन करुण आडगाव रेपाळ गावाचा पाणी पुरवठा कायम स्वरूपी सुरु केला आहे. गाव कायमस्वरूपी टैंकर मुक्त होणार आणि गावाला शुद्ध पाणीपुरवठा होणार यामुळे गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. सदर प्रसंगी मा. सरपंच नारायण गुंजाळ,गोरख जगताप, पांडु गायके, 38 गाव योजना व्यवस्थापक उत्तम घुले, महेश कदम, ग्रामसेवक रमेश कदम आदि उपस्थित होते.
गावे टैंकरमुक्त होण्यासाठी प्रथम प्राधान्य द्या असे ना. छगनरावजी भुजबळ साहेबांची सूचना आहे. 38 गाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवर 59 गावे झाली होती, आता 60 गावांना पाणीपुरवठा केला जाणार आहे. ना. भुजबळ साहेबांच्या मार्गदर्शनाने योजना आजही नफ्यात असून सुरळीत सुरु आहे.
- मोहन शेलार, उपाध्यक्ष ३८ गाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना,येवला