देशात कोरोनाचा प्रभाव वाढतच चालला आहे. त्यात कोरोनाग्रस्तांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. त्यामुळे राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ही गंभीर परिस्थिती हाताळण्यासाठी शासनाला निधीचा अभाव खूप मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. हीच गंभीर बाब लक्षात घेऊन नाते आपुलकीचे बहु. संस्थेने एक पाऊल देशहितासाठी टाकत सीएम रिलीफ फंडसाठी निधी गोळा करण्याची मोहीम सर्वप्रथम सुरू केली आहे.
मुळात नाते आपुलकीचे बहु. संस्था शिक्षण व आरोग्य या क्षेत्रात काम करते. आजवर अनेक समस्याग्रस्त रुग्णांना संस्थेने मदत केली आहे. सध्या कोरोनाचा प्रभाव वाढत चालल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणांसह सर्व सरकारी यंत्रणा कामाला लागल्या आहेत. सरकारने आपल्या परीने योग्य पाऊले उचलून राज्यात १४४ कलम लागू केलेली आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडणार आहे. सरकारने आपल्या परीने कितीही प्रयत्न केले तरी मानवतेच्या दृष्टीने आपलेही काही कर्तव्ये आहे, हाच मुळ उद्देश डोळ्यासमोर ठेवून सीएम रिलीफ फंडसाठी निधी गोळा करण्याची मोहीम नाते आपुलकीचे बहु. संस्थेने हाती घेतली.
संस्थेत जिल्हा, राज्य तसेच विदेशातील लोक या संस्थेत सदस्य आहेत. सर्व सदस्यांनी आपल्या इच्छाशक्तीनुसार निधी जमा करीत आहेत. आतापर्यंत १००च्या वर सदस्यांनी सीएम रिलीफ फंडसाठी निधी जमा केला असून तो ओघ सुरूच आहे. आपल्या संस्थेच्या माध्यमातून जो काही निधी गोळा होईल तो जिल्हाधिकारी यांच्यामार्फ़त सीएम रिलीफ फंडला देण्यात येईल, असे संस्थेच्या वतीने सांगितले. तसेच कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी जे कोणी इच्छुक असेल त्यांनी आपल्या परीने मदत अकाऊंट नं. ३०२६५५१२९९१ (जयंत देठे), आयएफएससी कोड एसबीआयएन०००४७११ किंवा गुगल पे नं. ९८९०३३१८१५ यावर पाठव शकता.