Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मार्च २४, २०२०

यंदा कोरोना’ला हरविण्याच्या घरात उपलब्ध साहित्यामध्ये सण साजरा करू या:विजय वडेट्टीवार


चंद्रपूर/प्रतिनिधी:
 यंदा मराठी नववर्षाच्या स्वागतावर कोरोनाचे सावट असल्याने गुढीपाडव्याच्या खरेदीसाठी घराबाहेर जाऊ नका, घरात उपलब्ध साहित्यामध्ये सण साजरा करा,असे आवाहन राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले असून नागरिकांना गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

गुढीपाडव्याचे स्वागत करण्यासाठी दारावर तोरण हमखास लावले जाते. त्याशिवाय गुढी उभारून तिला साखरगाठ्यांची माळ घातली जाते. सोनेखरेदी, कपडे खरेदीही केली जाते. मात्र, या खरेदीसाठी यंदा घराबाहेर पडू नये. असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री विजय वडेट्टीवार यांनी नागरिकांना केले आहे. राज्यात संचारबंदी लागू आहे या पार्श्वभूमीवर गुढीपाडव्याला खरेदीसाठी बाहेर जाऊ नका', खरेदीसाठी रस्त्यावर गर्दी केली तर कोरोनापासून संरक्षणासाठी उचलण्यात येत असलेल्या कठोर उपाययोजनांचा उपयोग होणार नाही, याचीही जाणीव त्यांनी करून दिली आहे. 

यंदा मराठी नववर्षाच्या स्वागतावर कोरोनाचे सावट असले तरी घरोघरी गुढ्या उभारल्या जातीलं, परंतु शोभायात्रांचं आयोजन व सामुहिक आयोजन टाळण्याचं आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे.

वडेट्टीवार यांनी सांगितले की साखरेच्या गाठी स्वतःच घरी तयार करा,'घरात उपलब्ध साहित्यामध्ये सण साजरा करा मात्र बाजारात गर्दी करू नका'. बत्ताश्यांऐवजी घरातच गोड पुऱ्या करून त्यांचा हार गुढीला घालता येईल. पूर्वी घरोघरी श्रीखंड घरातच तयार करत असत. तोच कित्ता पुन्हा गिरवता येईल, अशा आठवणीही त्यांनी जागवल्या. नागरिकांनी यंदा ‘ ‘कोरोना’ला हरविण्याच्या संकल्पाची गुढी उभारावी, असं आवाहनही त्यांनी केले आहे. 

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.