Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, मार्च २४, २०२०

अदृष्य कोरोना शत्रू सोबत युध्द आमचे सुरू #corona



शत्रू समोरा-समोर असेल, तर त्या विरूध्द लढणे सोपे. कोरोना हा अदृश्य शत्रू आहे. त्या विरोधात लढणे थोडे कठिण जाते. शक्तीशाली राष्ट्रांचाही या लढाईत टिकाव लागत नाही. चीन, कोरिया, स्पेन, अमेरिका, इटली, ब्रिटीश या धनाढ्य व बलाढ्य राष्ट्रांनाही नागी टाकावी लागली. शेकडो मृत्यू झाले. या रोगावर औषधी नाही. हा संसर्गजन्य आहे. झपाट्याने वाढतो. यास आटोक्यात ठेवण्यास खबरदारी हाच सर्वात मोठा उपाय. कोरोनाची लागण झालेला रूग्ण स्वत:हून उपचारासाठी पुढे यावयास हवा. हे होताना दिसत नाही. उलट लोकांमध्ये मिसळतात. तो रूग्ण जितक्या लोकांच्या संपर्कात येईल. ते सर्व कोरोना बांधित होतात. ते बांधित आणखी ज्यांच्या संपर्कात येतील. त्यांनाही संसर्गाचा धोका असतो. याच कारणाने तो अनेक पटीने पसरतो. त्याची लागण कोणाकोणाला झाली. हे सरकारला व प्रशासनाला माहित नसते. त्यांना शोधणे हे जिकरीचे काम. हा अदृश्य शत्रू  शोधण्यात खरा कस  लागतो. त्या  विरूध्द तीन आघाड्यांवर लढावे लागते. एकीकडे प्रत्यक्षात रूग्णांवर उपचार. दुसरीकडे  संपर्कात येणाऱ्यांवर उपचार आणि तिसरे प्रतिबंधात्मक उपाययोजना होय. 

त्या तिसऱ्या प्रकारात घरी बसा अन् कोरोना टाळा हा महत्वाचा उपाय आहे.  सोशल मीडियावर एक विनोद बहूचर्चित आहे. कोरोना स्वाभिमानी आहे. तो  स्वत:हून  तुमच्याकडे येत नाही. त्याला आणल्याशिवाय तो येत नाही. तुम्ही किंवा कोणी तरी त्याला आणेल. तेव्हाच तो तुमच्या घरात येईल. त्याला टाळावयाचे असेल तर घरात बसा. पाहुण्यांनाही  टाळा. घरात घ्यावयाचे असेल तर पाहुण्यांना क्वारंन्टाईन नंतरच आंत घ्या. ही खबरदारी घेतली तर तो तुमच्या आसपासही फिरकणार नाही.महायुध्दा पेक्षा मोठा धोका म्हणजे कोरोनाला समजले जात आहे. 
देशाच्या  इतिहासात पहिल्यादा  मंदिर, मस्जिद, चर्च, गुरूद्वार कुलूप बंद झाले.भाविकांनाही कळले.आता तारणहार देव नाही डाँक्टर आहे. कोरोनापुढे जात नाही. धर्म नाही. गरीब नाही. श्रीमंत नाही. काळा नाही. गोरा नाही. शहरी, ग्रामीण किंवा प्रादेशिक असा भेदाभेद नाही. काँग्रेस,राकाँ भाजप ,बसपा असाही मतभेद नाही. जो संपर्कात येईल. त्याला तो सोडत नाही. चौकीदारापासून पंतप्रधाना पर्यंत कोणाची भीडमूर्वत नाही. यामुळे जग हादरला.जगातील प्रत्येक माणूस हादरला आहे. स्वच्छता पाळा. संपर्क टाळा. बघत राहा. पुढे पुढे होतेय् काय ?

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या रोगाच्या उपाययोजनेबाबत पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये  या उपाययोजना समजू नका. हे कोरोना विरूध्द युध्द आहे. ते गांभीर्याने  घ्या. युध्दात शिस्त आवश्यक आहे. सरकारच्या सूचना पाळा. घरात थांबा. गरज नसताना घराबाहेर पडू नका. असा लाखमोलाचा सल्ला दिला. हे युध्द आहे. या एकाच उदगाराने त्यांनी महाराष्ट्राला जिंकले. तुमची साथ मिळाली तर आपण हे युध्द नक्की जिंकू. या शब्दात भावनिक आवाहन केले. ते  प्रत्येकाच्या ह्लदयाला साद घालणारे ठरले. चेहऱ्यावर कोणताही उपकाराचा किंवा अधिकाराचा आव नव्हता. केवळ कर्तव्य भावना झळकत होती. केंद्र सरकारकडे कोरोना नियंत्रणासाठी आर्थिक मागणी असो की लोकांना करावयाचे आवाहन  असो. कोरोना विरोधात प्रामाणिक लढा पुकारल्याचे जाणवते.  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहनावर जनता कर्फ्यू रविवारी झाला. तो यशस्वी झाला. मात्र टाळ्यांच्या नांदात त्याला गालबोट लागले. त्या तुलनेत अगोदर वाहतूक निर्बंध, मग वाहतूक बंद, लोकल ट्रेन बद , लाँकडाऊन. पाठोपाठ जमावबंदी अन् आता संचारबंदी असे एकएक पाऊल अतिशय शहाणपणाचे आहे. सुसंस्कृत राजकारणाची चमक दाखविणारे आहे. कोरोना विरूध्दचे युध्द लोकांच्या सहभागाने महाराष्ट्र जिंकेल. तेव्हा नवा इतिहास लिहला जाईल. त्यात राज्य सरकार आणि C.M.ने घेतलेल्या निर्णयाची नोंद होईल. कोरोना विरोधी लढ्यातील विविध खात्याच्या मंत्र्यांनी  घेतलेले निर्णय. लोकांनी दिलेली साथ. डाँक्टर व संबंधितांनी दाखविलेल्या दिलदारीची नोंद होईल. कारण या युध्दातील  खरे 'हिरो' डाँक्टर व परिचारिका आहेत.जे आपले जीव धोक्यात घालून अहोरात्र सेवा देत आहेत.त्यासोबतच अदृश्य शत्रू शोधण्यात योगदान देणाऱ्या यंत्रणांनाचीही नोंद होईल. त्यासाठी चला म्हणू सारे एका सूरात. युध्द अामचे अदृश्य कोरोना शत्रू सोबत सुरू.....!

आज मंगळवार राज्यात कोरोना बांधितांची संख्या १०० पार गेली. तर देशात ५०० पार झाली.१० जण दगावले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.