Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, मार्च १३, २०२०

सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता तातडीने द्या


📌विदर्भ प्राथमिक शिक्षक संघाची मागणी
📌 शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य) यांच्यासह सहविचार सभा 
📌अन्यथा तिव्र आंदोलनाचा इशारा

नागपूर - सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता व शिक्षकांच्या प्रलंबित मागण्या तातडीने सोडवाव्यात अन्यथा शिक्षकांच्या प्रश्नांसाठी तिव्र आंदोलन उभारण्याचा इशारा विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूर तर्फे देण्यात आला.
५ मार्च रोजी आयोजित आत्मक्लेश आंदोलन मागे घेण्यात आल्यानंतर आज (ता १२) शिक्षणाधिकारी (प्राथ) श्री चिंतामण वंजारी व माध्यमिक श्री शिवलिंग पटवे यांच्या दालनात विदर्भ प्राथमिक शिक्षक संघ नागपूरचे (प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघ) शिक्षक नेते श्री मिलिंद वानखेडे सरांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली.
यात सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता, DCPS व GPF च्या पावत्या तातडीने देण्यात याव्यात, सेवानिवृत्तीचे प्रकरण तातडीने निकाली काढावे, प्रशासकीय मान्यतेसाठी पडून असलेले सर्व देयके तत्काळ निकाली काढावे, नागपूर हायकोर्टात प्रकरण दाखल असलेल्या टिईटी धारकांचे  कोणतेच आर्थिक लाभ थांबवू नये यासह अनेक विषयावर माध्यमिक शिक्षणाधिकारी श्री शिवलिंग पटवे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली. यात शिक्षणाधिकारी (माध्य) श्री पटवे यांनी सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता तातडीने देण्याबाबद तसेच DCPS व GPF च्या पावत्या ३० जून पर्यंत देण्याबाबत आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश वेतन पथकाला दिले. तर  कार्यालयीन असलेल्या तक्रारी तत्काळ सोडविण्याचा प्रयत्न केला. यात शालार्थ आयडीचे प्रकरण, वैद्यकीय देयके व वरिष्ठ श्रेणीच्या प्रकरणाचा समावेश होता.
या बैठकीला शिक्षक नेते व माजी शिक्षण मंडळ सदस्य श्री मिलिंद वानखेडे, विभागीय सचिव खिमेश बढिये, माध्यमिक संघटक राजू हारगुडे, माध्यमिक संघटक शेषराव खार्डे, प्राथमिक जिल्हा ग्रामीण संघटक गणेश खोब्रागडे, शहर संघटक रविकांत गेडाम, समीर काळे, महिला जिल्हा संघटक सौ प्रणाली रंगारी, माध्यमिक संघटक सौ नंदा भोयर, सौ किरण भुजाडे, वेतन पथक कार्यालयाचे लेखाधिकारी (प्राथ) श्री शेगावकर, लेखाधिकारी (माध्य) श्री ठोमणे, श्री जिभकाटे, श्री मेंढुले, श्री पाटील, श्री दुहिजोड, श्री कुनघाटकर, श्री देशमुख, श्री कोहळे, श्री थोटे, श्री सोनवणे यांच्यासह शिक्षण विभागातील कर्मचारी उपस्थित होते.



SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.