Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, मार्च ०२, २०२०

कोरोनाची भीती चिकन प्रेमींच्या डोक्यातून काढण्यासाठी राज्यभरात चिकन फ्रेस्टीव्हलचे आयोजन

नागपूर/ललित लांजेवार:
चविष्ट, चवदार कोंबडी खायची म्हटल्यावर मांसाहारी व्यक्तीच्या तोंडाला पाणी सुटते. मात्र याच कोंबडी ने म्हणजेच चिकनच्या नावाने अपप्रचार झाल्याने चिकनच्या विक्रीला अचानक ब्रेक लागला,अन चिकनचा व्यवसायच कोरोनाणे खाल्ला.

सोशल मिडीयावर कोंबडीमुळे कोरोना फैलण्याच्या अपप्रचारामुळे चीकन प्रेमिनी चिकन खाणे सोडून दिल्याने पोल्ट्री व्यवसायाच्या संबंधित कंपनी व व्यवसायीकांनी आता चिकन मुळे कोरोना होत नाही हा गैरसमज दूर करण्सायासाठी राज्यभरात चिकन फ्रेस्टीव्हलचे आयोजन करणे सुरु केले आहे.



   फेब्रुवारी व मार्च महिन्यात राज्यातील नाशिक,पुणे,सांगली,कर्ह्यड,कोल्हापूर,विटे,व लातूर या ठिकाणी चिकन फ्रेस्टीव्हल चे आयोजन करण्यात आले आहे, या चिकन फ्रेस्टीव्हलमध्ये अनेक हौशी चिकन प्रेमींनी चिकन पासून बनणाऱ्या अनेक वेगवेगळ्या पदार्थाचा आस्वाद घेतला, या चिकन फ्रेस्टीव्हलला हौशीची चांगलीच गर्दी बघायला मिळाली. 

गेल्या २ महिन्यांपासून देशभरात विविध कंपन्या व मोठ मोठे चीकन व्यापारी एकत्रित येत चिकन फ्रेस्टीव्हल जिल्ह्याच्या ठिकाणी चिकन चिकन फ्रेस्टीव्हलचे आयोजन करत असून यातून चिकन खाण्यासाठी योग्य आहे भारतात कोरोनाचा धोका नाही,हे या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करीत आहेत.


महील २ महिन्यात देशभरातील चिकन व्यवसाय संपण्याच्या मार्गावर आला असून सरकार मात्र यात कोणतीच मदत करत नसल्याचे चित्र वर्तमान स्थितीत दिसत आहे.

विशेष म्हणजे महील २ महिन्यात ७०० कोटी पेक्षा जास्त नुकसान महाराष्ट्रातील पोल्ट्री व्यवसायीकांना व कंपन्यांना सहन कराव लागला असल्याने पोल्ट्री फार्म सुरु करण्यासाठी घेतले कर्ज देखील फेडायची लायकि पोल्ट्री फार्मर यांची नसल्याने आता फक्त आत्महत्या करणे बाकी आहे अशी चर्चा पोल्ट्री फार्मर करू लागले आहे.
त्यामुळे पोल्ट्री फार्मरच्या या चिकन फ्रेस्टीव्हलच्या आयोजानानंतर पोल्ट्रीत उठाव येणार का?याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे. 

अनेकदा शाकाहारी लोकांना मांसाहार करणाऱ्यांचा हेवा वाटू लागतो. पण चिकनची खासियत फक्त त्याच्या चवीत नाहीये तर चिकन खाण्याचे अनेक फायदेही आहेत. 


प्रोटीन सप्लाय- 
चिकनमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतं. त्यामुळे जिम करणाऱ्यांना तसंच डाएट करणाऱ्यांना चिकन खाण्याचा सल्ला दिला जातो. प्रोटीनमुळे आपल्या मांसपेशींना ताकद मिळते. ज्यांना शरीराची ताकद वाढवायची असेल त्यांनी चिकन खाण्याला प्राधान्य दिलं पाहिजे.

वजन कमी करण्यात होते मदत- 
सुदृढ आहारात चिकनचा समावेश केला जातो. हे लीन मीट आहे. याचा अर्थ असा की यात फार फॅट नसतात. त्यामुळे नियमित स्वरुपात चिकन खाण्याने वजन कमी होण्यास मदत मिळू शकते.

हाडांची ताकद वाढते- 
प्रोटीन व्यतिरिक्त चिकनमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फोरस मुबलक प्रमाणात असतं. या दोन्ही गोष्टी हाडांना मजबूत करण्यात आणि त्यांची ताकद वाढवण्यात अतिशय उपयोगी आहेत. त्यामुळे नियमित स्वरुपात चिकन खाल्ल्याने शरीरात गाठी होण्याचा धोकाी कमी होतो.

तणावापासून मुक्ती- 
चिकनमध्ये ट्रिप्टोफेन आणि विटामिन बी5 हे मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं. हे शरीरातील तणाव कमी करण्यात मदत करतं. चिकनमध्ये मॅग्नेशियमही असतं. यामुळे पीएमएसच्या लक्षणांपासून दूर राहण्यास मदत होते. त्यामुळे चिकन खाल्ल्यामुळे तुम्ही तणावमुक्त होऊ शकता.

रोग प्रतिकारशक्ती वाढते- 
चिकनमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचे अनेक गुणधर्म आहेत. सूप स्वरुपात चिकन खाणं जास्त फायदेशीर आहे. सर्दी दूर करण्यासाठी चिकन सूप पिणं सर्वोत्तम मानलं जातं.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.