पुणे, नाशिक येथे तरुण अङकले
चंद्रपूर,दि. 31 मार्च : जगभरात धुमाकूळ घातलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशभरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रवासावरही अटी लावण्यात आल्या आहेत. यामुळे मूळचे चंद्रपूर जिल्ह्यातील मेहा येथील 50 हून अधिक गावकरी तेलंगाणा, आंध्रप्रदेश राज्यात अडकले आहेत .
ब्रम्हपुरी, सावली, सिंदेवाही, या तालुक्यांसह चंद्रपूर जिल्ह्यातील किमान 10 हजार मजूर तेलंगणा राज्यातील विविध गावात मिरची तोडण्याच्या मजुरीसाठी गेले असता अचानक लागू झालेल्या लॉक डाऊनमुळे तेलंगना राज्यात अडकून पडले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अचानक जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली. यामुळे मेहा येथील मजुरांना स्वगृही परतण्यासाठी कोणताही मार्ग उपलब्ध नसून यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहीती आहे.
कोठेगुड्डम आणि खम्माम, महबूबनगर जिल्ह्यात शेकडो मजूर अडकले आहेत. महाराष्ट्र आणि तेलंगणा सरकारने आपसात बोलून या बांधवांना अन्न धान्य, पाणी, किराणा व राहण्याची सोय करून दिली पाहिजे. सुखरूप घरी पोहचेपर्यंत काळजी घेतली पाहिजे, अशी विनंती अॅङ पारोमिता गोस्वामी यांनी केली आहे.