सावली/ प्रतिनिधी
सध्या कोरोना व्हायरस ने जगाला भयभीत करून टाकले आहे. या कोरोना विषाणू पासून कोणीही मोकळा श्वास घेण्यास असमर्थ ठरला आहे. यावर शासनाने अनेक उपाययोजना अमलात आणल्या जात आहे. घराच्या बाहेर न निघणे, एकमेकांपासून दूर राहणे, वारंवार हात स्वच्छ धुणे, खोकलतांना तोंडावर रुमाल किंवा हात आणणे असे अनेक उपाययोजना कोरोना या विषाणूला रोखण्यासाठी करतांना दिसून येत आहे. याचप्रकारे महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ सावली तालुक्याच्या वतीने सावली तालुक्यात मास्क वाटप कार्यक्रम हाती घेतले आहे. या मास्क वाटप कार्यक्रमाच्या माध्यमातून कोरोना व्हायरस बाबतीत तालुक्याच्या जनतेला माहिती देऊन जनजागृती करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून आज दि. 31 मार्च रोजी व्याहाड बुज. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व भटके लोकांच्या तांडा वस्तीत महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघ सावली तर्फे येथील कर्मचारी व रुग्णांना तथा भटके लोकांना मास्क चे वितरण करण्यात आले. यावेळेस महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघांचे सदस्य अनिल गुरनुले , सदस्य प्रवीण गेडाम , व्याहाड बुज. ग्रामपंचायत चे उपसरपंच योगेश बोमनवार, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गणवीर, स्वप्नील बोमनवार उपस्थित होते.Top News
सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा
पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...
ads
मंगळवार, मार्च ३१, २०२०
Author: खबरबात
खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.
या बातम्यादेखील नक्की वाचा
- Blog Comments
- Facebook Comments