कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर देशासह राज्यात जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र कडकडीत बंद आहे. अशावेळी गरजूवंतांची, कष्टकऱ्यांची उपासमार होऊ नये म्हणून इको-प्रो तर्फे शहरातील गरीब गरजू परिवाराची निवड करून त्यांना आवश्यक किराणा किटचे वाटप करण्यात येत आहे.
यात घरकाम करणारे विधवा महिला, लहान मुले असलेले एकट्या महिला, वृद्ध जोडपे, दिव्यांग आणि ज्यांचे हातावर पोट असलेले परिवार, कोरोना लॉकडाउन मुळे ज्यांचे रोजगार गेलेले आहेत अश्या परिवाराची निवड करण्यात आलेली आहे. इको-प्रो चे सदस्य यांनी त्यांचे राहते घर परिसरातील त्यांच्या पाहण्यात असलेली अशी गरजू व्यक्तिची यादी तयार केली असून त्या निवडक परिवारास या किटचे वाटप करण्यात येत आहे. याकरिता संस्थेचे शुभचिंतक असलेल्या व्यक्तिकड़ून किराणा साहित्यांची मदत मिळविन्यात आलेली आहे.
गरजू व्यक्तीना देण्यात येत असलेल्या किराणा किट मधे तांदूळ, गव्हाचे पीठ, तुवर दाळ, तेल, बेसन, साखर, पत्ती,आलू, कांदे, तिखट, हळद, मीठ, बिस्किट, आंघोळीची साबन, डिटर्जेंट साबन या वस्तुचा समावेश आहे. सदर किट या परिवाराच्या घरापर्यंत पोहचवून देण्याचे तसेच दिवसभर या किट तयार करण्याच्या कार्यात संस्थेचे सदस्य हातभार लावत आहेत.
या कठिण प्रसंगी जागृत नागरिकांनी स्वतःच्या घर-परिसर मधील गरजू व्यक्तीना आवश्यक मदत करावी. किंवा ज्यांना इको-प्रो च्या माध्यमाने मदत करायची असल्यास तसे आवश्यक किराणा साहित्य संस्थेस आणून देता येईल.