माणूस माणसाचा इतका वैरी झाला आहे की त्याला नात्याचा देखील भान राहिलेलं नाही. काका-पुतण्याच्या नात्याला काळीमा फासणारी अशीच एक धक्कादायक घटना येवला तालुक्यातील सुकी या गावात घडली
येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार
येवला: 01 फेब्रुवारी; सध्या साधन-संपत्ती मिळवण्यासाठी माणूस माणसाचा इतका वैरी झाला आहे की त्याला नात्याचा देखील भान राहिलेलं नाही. काका-पुतण्याच्या नात्याला काळीमा फासणारी अशीच एक धक्कादायक घटना येवला तालुक्यातील सुकी या गावात घडली.
काका-पुतण्यात शेतीची जमीन वाटपावरून झालेल्या वादाचे पर्यवसान गोळीबारात होऊन वडिलांच्या जागी असलेल्या चुलत्या थेट तरुण पुतण्यावरच गोळी झाडली. गोळी पुतण्याच्या छातीत लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला असून येवल्याच्या शासकीय रुग्णालयात त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले, मात्र, त्याची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्याला नाशिकच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तेथे तो मृत्यूशी झुंज देत आहे. पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या चुलत्याला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या बाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येवला तालुक्यातील सुखी येथे राहणारा परसराम थोरात याचा काका गजानन थोरात सोबत जमिनीवरून वाद सुरू होता. गजानन थोरात हा सैन्यात होता. आता तो सेवा निवृत्त होऊन नाशिकला राहण्यासाठी आला आहे. आज तो सुकीला आल्यानंतर त्याचे पुतण्यासोबत जमिनीच्या वादा वरून कडाक्याचे भांडण झाले. या भांडणाचे पर्यावसन गोळीबारात होऊन चुलता गजानन याने मागचा-पुढचा विचार न करता मुला सारखा असलेला पुतण्या परसराम याच्या छातीत थेट गोळी झाडली.
गोळी लागल्यानंतर परशराम जमिनीवर कोसळला त्याला तातडीने येवल्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले येथे त्याच्यावर प्राथमिक उपचार केले गेले. मात्र, त्याची प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्याला नाशिकच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पोलिसांनी चुलता गजानन याला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.