छगनरावजी भुजबळ यांचे आवाहन
येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार
येवला: देवसाने प्रकल्पाचे भिंती चे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. असे काम सुरू राहीले तर काम कधी पूर्ण होणार? असा प्रश्न करत पावसाळ्या अगोदर कोणत्याही परिस्थितीत काम पूर्ण करा अश्या सूचना पाटबंधारे विभागाच्या अधिकारी यांना भुजबळ फार्म येथील आयोजित बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.
पुणेगाव ते दरसवाडी हा 63 किमी चा पाण्याचा प्रवास चाचणी वेळेस अतिशय अडचनीतून झाला. पाणी अनेक ठिकाणी लिकेज आहे, काँक्रीटीकरण प्रस्ताव प्रस्तावित आहे,पण त्या अगोदर तात्काळ पाणी गळती होणार नाही यावर उपाययोजना करा. किमी 1 ते 25 मधील रुंदीकरण चे राहिलेले काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना केल्या तसेच वणी येथील बोगदा रुंदीकरण काम लवकर सुरू करून पुणेगाव ते दरसवाडी या पावसाळ्यातच पुर्णतः 220 क्यूसेस ने कसा प्रवाहित होईल यावर उपाययोजना करा, काही अडचणी असतील तर तात्काळ मला फोन करा, शासन स्तरावर तात्काळ अडचणी सोडवल्या जातील असे ना. भुजबळ यांनी अधिकारी यांना सूचित केले.
दरसवाडी ते बाळापूर हा 40 किमी पाणी प्रवास देखील खूप अडचणी आलेल्या आहेत.154 क्यूसेस कॅनॉल मध्ये फक्त 50 क्यूसेस पाणी प्रवाहित होते. हा कॅनॉल पूर्णपणे 154 क्यूसेस ने प्रवाहित झाला पाहिजे. केदराई ते दरसवाडी 6 किमी कालवा दुरुस्त केल्यास तसेच काळलवन ,जोपूळ नदीचे पाणी दरसवाडी धरनात वळवल्यास दरसवाडी धरण लवकर भरण्यास मदत होईल व दरसवाडी धरणातुन पाणी लवकर सोडता येईल असे आंदोलक मोहन शेलार यांनी निदर्शनास आणून देताच यावर कार्यवाही करून तात्काळ प्रस्ताव सादर करा, जे काम सुरु करणे शक्य असेल ती कामे तात्काळ सुरू करण्याचे आदेश ना. भुजबळ यांनी केले.
बाळापूर ते डोंगरगाव हा 48 किमी मध्ये समाधानकारक काम सुरू आहे . मात्र अजूनही रेल्वे क्रॉसिंग काम सुरू नाही. या आठवड्यात सोलापूर रेल्वे डिव्हिजन ची परवानगी झाली हा महत्वाचा टप्पा पार झाला असला तरी मुंबई रेल्वे कमिशनर परवानगी शिवाय काम सुरू करता येणार नाही. त्यामुळे तात्काळ प्रस्ताव तयार करून संबंधित विभागात सादर करा अश्या सूचना ना. भुजबळ यांनी केल्या.
बैठकीस मुख्य अभियंता किरण कुलकर्णी, अधीक्षक अभियंता अरुण नाईक, कार्यकारी अभियंता श्री शिंपी, सोनवणे,गोवर्धने, सौ. अलका आहिरराव, दिलीप खैरे,मोहन शेलार सुनील पैठणकर आदी उपस्थित होते.