चंद्रपूर /ललित लांजेवार
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील बाराव्या वर्गात शिकत असलेल्या मुलाने महाविद्यालयातच गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
ललित रविंद्र बोराडे (१८) असे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील कृषक विद्यालय चौगान येथे ललित बाराव्या वर्गात शिकत होता. सोमवारी जेव्हा विद्यार्थी वर्गात आले तेव्हा ललितने गळफास घेतल्याचे दिसून आले.
I am not perfect but i am honest
मि परिपूर्ण नाही पन प्रामाणिक आहे
I am alone
मि दुखी (एकटा) आहे
Sorry principle sir
माफ करा प्राचार्यसर
I dont want to live my life
मला माझ्या आयुष्य जगायचे नाही आहे
And of my life
मी माझे आयुष्य संपवीत आहे
असे इंग्रजीतच महाविद्यालयाच्या बोर्डावर खडूच्या सहाय्याने लिहून वर्गातच बेंचवर चढून फॅनच्या हुकाला दोरी हिलगवुन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार ललित एकटाच राहायचा व तो शांत स्वभावाचा होता.
या घटनेनंतर संपूर्ण महाविद्यालय परिसर हादरून गेला व जिकडे तिकडे आत्महत्येची बातमी सुरू झाली. या बातमीनंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण झाली.
मात्र ललित ने आत्महत्या का केली असावी? व ब्लॅकबोर्ड वर लिहून ठेवलेल्या संदेशाचा ललित व प्राचार्य यांच्याशी काय संबंध होता? प्राचार्यांनी ललितला रागावले असावे का? अशा बऱ्याच प्रश्नांचे उत्तर सध्यातरी अनुत्तरित आहेत. त्यामुळे ब्रह्मपुरी पोलीस या घटनेचा तपास कोणत्या प्रकारे करते व सत्यता उघड करते,याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.