चंद्रपुर/प्रतिनिधी:
चंद्रपूर जिल्हा वृत्तवाहिनी पत्रकार संघाची आमसभा पार पडली. या सभेत जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यासाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. यात अध्यक्षपदी टीव्ही ९ चे जिल्हा प्रतिनिधी नीलेश डहाट, तर सर्च टिव्हीचे पवन झबाडे यांची सचिवपदी निवड करण्यात आली.
वृत्तवाहिनी पत्रकार संघाची स्थापना करण्यात आल्यानंतर पहिलीच आमसभा रविवारी (ता. २) वनविभागाच्या रामबाग विश्रामगृहात पार पडली. सभेला ज्येष्ठ पत्रकार सुनील तायडे, विकास राजूरकर, सारंग पांडे, सुशांत घाटे, राजेश अलोने,मिलींद दिंडेवार, राममिलन सोनकर यांची उपस्थिती होती. यावेळी दोन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणीच्या निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी नीलेश डहाट यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
तर, सचिवपदासाठी झालेल्या निवडणुकीत पवन झबाडे यांनी बाजी मारली. नवीन कार्यकारिणीत उपाध्यक्ष हबीब शेख, कोषाध्यक्ष बल्लू चव्हाण यांची निवड करण्यात आली. यातच आज नियोजन भवन येथिल पालकमंत्री कार्यालयात नवनिर्वाची अध्यक्ष व सचिव यांचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले