Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जानेवारी १७, २०२०

रंगपंचमी मकरसंक्रांतीचा पंतगोत्सव




येवला प्रतिनिधी:- विजय खैरनार
पैठणी साठीप्रसिद्ध असलेल्या येवले शहराची ओळख आहेच मात्र येथील रंगपंचमी मकरसंक्रांतीचा पंतगोत्सव येवले कराचे ऊत्साहाचे तसे पाहता येवला हेउत्सव वेडे शहर आहे येथे कुठल्याही सण मग तो कोणत्याही समाजा चा असो मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.
मकरसंक्रांतीनिमित्त दि.14मंगळवार पासुन पंतगोत्सवाला सुरवात झाली शहरातील अबालव्रुद्ध या पंतगोत्सवाचा मनमुराद आनंद लुटत आहे. सकाळ पासून च पतंगप्रेमी घराच्या छतावर पतंग उडविण्यासाठी सज्ज झाले होते. दिवसभर मोठ्या प्रमाणावर डि.जे. च्या तालावर पतंग उडविण्यात आल्या शहरातील प्रत्येक घराच्या छतावर तरुणाई चा जल्लोष व डि.जे. च्या आवाजाने दुमदुमले होते. येवल्यात भोगी,मकरसंक्रांत,
आणि करहे तिन दिवस पतंगोत्सवाची मोठी धुम असते.
पतंगाने आकाशात भरारी घेताच पतंग काटा-काटी ची स्पर्धा रंगत अगदी दिलखुलास पणे सुरू असते
घरातील सर्वच कुटुंब महिला-पुरुष या तिनही दिवस घराच्या छतावर या पतंगोत्सवाचा आनंद घेतात.
मंगळवार हा येवल्याचा आठवडे बाजार असुन सुद्दा
या दिवशी बाजारात शुकशुकाट होता. तरुणाई बरोबर जेष्ठ ही या उत्सवात सहभागी होतात .विषेश म्हणजे येवलेकरासह त्यांचे ईतर शहरातील नातेवाईक ही या पतंगोत्सवा साठी येवल्यात दाखल होतात अनेक पतंग शौकीन स्वतः पतंग तयार करून उडविण्याला प्राधान्य देतात. काटा-काटीचा मैत्रीपुर्ण खेळ या उत्सवाचा उत्साह
अधिक फुलवितो एक पतंग कटली की मोठ्या दिलाने
परभव स्विकारुन पुन्हा काटा-काटी साठी दुसरा पतंग हवेत सोडला जातो. भोगी मकर संक्रात आणि कर.हे तिन दिवस महत्वाचे मानले जातात यातिन दिवसात शहरात मोठ्या प्रमाणावर पतंग उडविले जातात पतंग खरेदी-विक्री मुळे शहराच्या बाजारात लाखो रुपयांची उलाढाल होते.....दरम्यान राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री व जिल्ह्याचे पालक मंत्री छगन भुजबळ यांनी पतंग उडविण्याचा आनंद घेतला तसेच कापसे पैठणीचे संचालक बाळासाहेब कापसे,दिलीप दाजी खोकले,गोल्डमैन पंकज पारख,सहकार नेते अंबादास बनकर,जिप सदस्य संजय बनकर,आदींनी पतंगोत्स्वाचा आंनद लुटला सायंकाळी प्रचंड प्रमाणात फट्याक्यांची आतिश बाजी करण्यात येवून समारोप करण्यात आला .

खल्लास....... कटलीरे.......असा आरडाओरडा करत अबालव्रुद्ध येवले करांनीतिन दिवस पतंग उडविण्याचा आनंद लुटला चित्रपट गीतांच्या तालावर पतंग हवेत नेत तरुणाई ने धमाल केली. तसेच सुवासिनींनी पुजा करून मकरसंक्रांत साजरी केली संध्याकाळी लहान थोरांनी तीळगूळ दिले त एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.