वरोरा तालूका माळी समाज सेवा मंडळाच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती उत्सव व गुणवंत विदयार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रम
नागपूर/ प्रतिनिधी
समाजात जगत असताना शिक्षणाचे महत्व अधिक असून सक्षम आणि निर्भीड समाज घडविण्यासाठी शिक्षीत व्यक्तिंची समाजाला गरज आहे. क्रांतीसुर्य ज्योतिबाई फुले यांच्या जयंती निमित्य आज सर्वत्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. या आयोजनाच्या माध्यमातून ज्योतीबा फुले यांची संघर्षगाथा आजच्या पिढी समोर आली पाहिजेत शिक्षणातूनच अन्याया विरोधात संघर्ष करण्याचे बळ मिळते सक्षम समाज घडविण्यासाठी शिक्षणाची गरज आहेत. त्यामूळे समाजातील एकही विदयार्थी शिक्षणापासून वंचित राहायला नको असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमीत्य आज शनिवारी वरोरा येथे वरोरा तालूका माळी समाज सेवा मंडळाच्या वतीने सावित्रीबाई फुले जयंती उत्सव व गुणवंत विदयार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी अविनाश ठाकरे, प्रदेश अध्यक्ष माळी महासंघ, गोविंदराव वैराळे, अध्यक्ष माळी महासंघ नागपूर, अहतेशाम अली, नगराध्यक्ष वरोरा, अरुन तिखे, सचिव महाराष्ट्र माळी महासंघ, धनंजय दानव, सचिव जिल्हा माळी महासंघ, अशोक खडके, सामाजिक कार्यकर्ते आदिंची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, महिला शिक्षणासाठी संघर्ष करत असतांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समोर अनेक अडचणी आल्यात मात्र त्यांनी त्यावर मात करत महिलांना शिक्षीत करण्याचे ध्येय पूर्ण केले. त्यांनी त्याकाळी केलेल्या संघर्षामूळेच आजची महिला शिक्षीत झाली आहेत असे असले तरी अनेक भागात आजही महिलांना उच्च शिक्षण घेण्यात अडचणी येत आहेत. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. माझ्या कार्यालयात दररोज शेकडो लोक काम घेवून येतात मात्र यात शिक्षणासाठी येणाऱ्यांची संख्या कमी असल्याची खंतही यावेळी जोरगेवार यांनी बोलून दाखवली. शिक्षण घेण्यासाठी वयाची मर्यादा नाही. त्यामूळे तूमच्यातला विदयार्थी नेहमी जिवंत राहला पाहिजे असे आवाहनही यावेळी जोरगेवार यांनी केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी लढा उभारला या लढयात त्यांना अनेक अडचणी आल्यात पण त्यांनी महिला सुशिक्षीत करण्याचा घेतलेला दृढ निश्चय मागे घेतला नाही. त्यावेळी त्यांनी महिला शिक्षणासाठी केलेल्या संघर्षामुळेच आजची महिला शिक्षण क्षेत्रात उंच शिखर गाठत आहे. ति शिक्षीत झाली असली तरी आपल्या अधिकारांप्रति पूर्णताह जागरुक झालेंली दिसत नाही. त्यामूळे आता महिलांनी शिक्षीत होण्याबरोबरच आपल्या हक्कांप्रती जागृक होवून सौरक्षीत होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले. महिला शाळेच्या पहिल्या मूख्यध्यापीका सवित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत असतांना महिला शिक्षणासाठी त्यांनी सहण केलेल्या हाल अपेक्षा विसरता कामा नये, त्याकाळी महिलांवर होणारे अन्याय दूर करण्यासाठी महिला शिक्षीत झाल्या पाहिले यासाठी सावित्रीबाई फुले यांनी शेवट पर्यंत संघर्ष केला. त्यांच्या संघर्षामुळेच आज मूली शाळेची पायरी चडू शकत आहे. त्यामूळे शिक्षणाचा अधिकाराचा महिलांनीही वापर केला पाहिजे. आज गुणवंत विदयार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात गुणंवतांमध्ये मुलींची संख्या अधिक आहे. हे चित्र आता सर्वत्र पहायला मिळत आहे. मुली शिक्षण क्षेत्रात गाठत असलेल उंच शिखर पाहून आनंद होते. कारण एक मुलगी शिक्षीत झाली तर एक कुटुंब शिक्षीत होत असत. असे ही यावेळी जोरगेवार यांनी सांगीतले. गुणंवत विदयार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमांचे आयोजन नियमित झाले पाहिजे अशा आयोजनातून विदयार्थ्यांना प्रोत्साहण मिळत असते. असे सांगत त्यांनी या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आयोजगांचे कौतूक केले. यावेळी समाज बांधवांसह विदयार्थ्यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. --