नागपूर/ प्रतिनिधी
श्री. मुनिश्वर महाराज मंदिर,सावरगाव येथे सूर्यनमस्कार मंडळाच्या वतीने उद्या दिनांक ०१/०२/२०२० शनिवारला रथसप्तमीनिमित्त जागतिक सूर्यनमस्काराचे आयोजन करण्यात आले आहे.यावेळी सकाळी ०७:०० वाजता सामूहिक सुर्यनामस्कार टाकण्यात येईल.
स्थानिक सूर्यनमस्कार मंडळाच्या वतीने पौष महिन्यात सव्वा महिना दररोज सकाळी६:०० ते ७:०० पर्यंत सूर्यनमस्कार टाकण्यात येते. गेल्या *४६ वर्षांपासून ही परंपरा कायम आहे. यावर्षी सुद्धा सव्वा महिन्यापासून सूर्यनमस्कार टाकण्यात आले.दरवर्षी येथे कडाक्याच्या थंडीतही शेकडो आबाल,वृद्ध,युवक मोठ्या संख्येने सुर्यनमस्कारासाठी येतात.
या ठिकाणी सुर्यनमस्कार मंडळाच्या वतीने यावर्षी ५१,०००(एक्कावन्न हजार) सूर्यनमस्कार टाकण्याचा संकल्प करण्यात आला होता.मंडळाच्या वतीने उद्या दिनांक ०१/०२/२०२० शनिवारला सकाळी ०७:०० वाजता स्थानिक मुनिश्वर महाराज मंदिर येथे सामूहिक सूर्यनमस्कार टाकून ५१,००० सुर्यनामस्काराचा संकल्प पूर्ण करण्यात येईल.
संकल्प पूर्ण झाल्यानिमित्त सर्व उपस्थित सूर्यनमस्कार मंडळाच्या उपसकांना व गावातील विद्यार्थी व नागरिकांना १०० लिटर दुधाचा प्रसाद वितरित करण्यात येईल.तसेच दिनांक ०२/०२/२०२० रविवारला सुर्यनमस्काराची सांगता करण्यात येईल.तरी या दोन्ही कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन सूर्यनमस्कार मंडळाचे अध्यक्ष सुरेशजी जयस्वाल व मंडळाच्या सर्व सदस्यांनी केले आहे.