Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, जानेवारी ३१, २०२०

दारू गाळण्यासाठी लढविली शक्कल; गोठ्यात बनविले तळघर

वर्धा;प्रमोद पाणबुडे:
स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने गुप्त माहिती मिळाली कि वायगाव (नि ) येथे राहणारा सुमेध नगराळे वय 34 वर्ष हा आपले रामपुरी शेतशिवारातील सिमेंट कॉक्रीटचे कोठ्या मध्ये अवैध रित्या कच्चा मोहा रसायन सडवा साठवून गावठी मोहा दारू गळतो.

या माहिती वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने सुमेध नगराळे याचे शिवारातील कोठ्यावर पंचासह छापा टाकला असता सुमेध नगराळे हा कोठ्यावर हजर मिळून आला असता पंचासमक्ष कोठ्याची बारकाईने पाहणी केली असता कोठ्यातील दुसऱ्या रूम मध्ये कापसाचे भरपूर प्रमाणात गाठोडे रचून ठेवले होते सदर गाठोडे बाजूला सरकवून बारकाईने पाहणी केली असता तेथे त्यांना भुयारी मार्ग सापडला तेथून सीडी ने तळघरातील रूम मध्ये प्रवेश करताच तेथे 15 ड्रम मध्ये अंदाजे 3000 लिटर कच्चा मोहा रसायन साडवा साठवून होता.


तसेच तळघरात इलेक्ट्रिक ची फिटिंग केली होती व मोटर पंप द्वारे सदर सडवा बाहेर आणून तो मोहा दारू गाळत असे असे निदर्शनास आले सदर कारवाईमध्ये सर्व मोहा सडवा पंचासमक्ष नाश करून व इतर भट्टी साहित्य पंचासमक्ष नाश करण्यात आले व पाणी व मोहा सडाव्या साठी वापरलेल्या दोन मोटर पंप जप्त करण्यात आल्या.


सदर कारवाई मा.पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली सा, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे सा,पोलीस निरीक्षक निलेश ब्राम्हणे स्था. गु. शा यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि आशिष मोरखडे, पो.हवा निरंजन वरभे, नरेंद्र डहाके, ना.पो. शी विकास अवचट पो.शी संघसेन कांबळे, राकेश आष्टणकर, नितीन इटकरे यांनी केली

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.