येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार
येवला : येथील स्वामी मुक्तानंद विज्ञान महाविद्यालयात मकरसंक्रांत सणाचे औचित्य साधून पर्यावरण रॅलीचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला, महाविद्यालयाच्या पटागंणावरुन रॅलीचा शुभारंभ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डाॅ बाळासाहेब रहाणे यांनी पर्यावरण बचावचा नारा देऊन रॅलीचे उद्घाटन केले याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ धनराज गोस्वामी, अंतर्गत गुणवत्ता आश्वासन कक्षाचे समन्वयक डॉ सुदाम पातळे , प्रसिध्दी विभाग प्रमुख डाॅ साहेबराव धनवटे, वनस्पती शास्त्र विभाग प्रमुख डाॅ मनोहर पाचोरे गणित विभाग प्रमुख मा प्रा संगिता पांडे, रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा के के जाधव, प्रा रामभाऊ वडाळकर, प्रा बाळु पांढरे रासेयोचे अधिकारी डॉ विभांडिक, प्रा पुरुषोत्तम पाटील, डॉ विवेक पाटील विद्यार्थी कल्याण मंडळाचे प्रा अजय त्रिभुवन,आदी प्राध्यापक व प्राध्यापकतेर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रॅली गंगादरवाजा मार्गाने,सेनापती तात्या टोपे पुतळापासुन काळामारुती , राणाप्रताप चौक आझाद चौक, सराफ बाजार, कापड बाजारपेठ, बुरुड गल्ली, फत्तेहबुरुज मार्गे रॅलीची सांगता करण्यात आली याप्रसंगी विद्यार्थिनी मकरसकांरतीच्या पूर्वसंध्येला पतंग उडविताना नायलॉन व मांजा दोरा वापरु नका असे आवाहन ठिकठिकाणी भेटलेल्या पतंग उडविणार्या हौशी तरुणांना केले, आजच्या रॅलीचे मुख्य उद्दिष्ट पतंग उडविणार्या हौशी तरुणांमध्ये जागृती निर्माण करणे हाच होता तसेच ध्वनी प्रदूषण कमी करण्यासाठी देखील जागोजागी महाविद्यालययीन विद्यार्थी अहवान केले नायलाॅन दोरा वापरल्यामुळे निरपराध पक्षी व प्राण्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो तसेच मोठ्या आवाजात गाणी सादर केल्याने ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते पर्यायने लहान बालके व वयोवृद्धाना त्रास होऊ शकतो आणि हे सर्व थांबवयाचे असेल तर मकरसंक्रांत सर्व प्रकारच्या प्रदुषण मुक्त साजरी करा असे आव्हान रॅलीचे माध्यमातून विद्यार्थी वर्गाने केले , याप्रसंगी ठिकठिकाणच्या चौकात व गर्दीच्या ठिकाणी महाविद्यालयाचे वनस्पती शास्त्राचे प्रा डॉ मनोहर पाचोरे ,व पदार्थ विज्ञान विभाग प्रमुख डॉ साहेबराव धनवटे यांनी पर्यावरण जागृती संदर्भात मार्गदर्शन केले आपल्या भाषणात बोलताना त्यांनी येवला शहर हे संस्कृती जोपासणारे व पारंपरिक उत्सव साजरे करणारे शहर आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे ,मकर संक्रांतीचा सण देखील मोठ्या उत्साहाने साजरा करणारे महाराष्ट्रातील हे एकमेव गाव आहे परंतु पतंगबाजी करत असताना नायलॉन व मांजा दोरा वापरणे टाळावा व प्राण्यांची व पक्षांचे जीवितहानी होऊ नये यासाठी काळजी घ्यावी असं आव्हान त्यांनी स्वयंसेवकांना व अप्रत्यक्षपणे शहरवासीयांना केले आपल्या भाषणात बोलताना त्यांनी पर्यावरण म्हणजेच आपले जीवन आहे व त्याचे संवर्धन करणे हे आपलं कर्तव्य आहे फक्त प्लास्टिक मुक्ती देश करून चालणार नाही तर पक्षी व प्राण्यांना जीवदान देणे हे आपलं कर्तव्य आहे व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मानवजातीपेक्षाही त्यांचा निसर्गासाठी जास्त उपयोग आहे शेतामध्ये किटकनाशकांचा वापर कमी करायचा असेल तर फक्त पक्ष्यांची संख्या वाढली पाहिजे पर्यायाने कीटकांची संख्या कमी होईल व भरमसाठ प्रमाणात शेतामध्ये रासायनिक औषधांचा वापर कमी होईल या माध्यमातूनच निसर्गाचा समतोल राखला जाईल असेही ते म्हणाले याप्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध पर्यावरण बचावच्या घोषणांनी येवले शहर दुमदुमून निघाले होते रॅलीचे यशस्वी आयोजन प्रा वडाळकर आर एन व प्रा पांढरे बी एस यांनी केले