ललित लांजेवार/नागपूर:
2015 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लागू झालेली दारूबंदी आता अवघ्या पाच वर्षांत काढण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकार करणार असल्याचे वृत्त आहे. २०१५ ला युती सरकारने चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी केली होती.त्यानंत हि दारूबंदी चालढकल करत २०२० परियंत आली आणि महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होताच चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटवण्याचा मोठा निर्णय महाविकास आघाडी सरकार घेणार आहे.
महसुलात आलेली घट बघता ठाकरे सरकारने दारूबंदी हटविणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तासाभरानं दारू विक्रीचा वेळ सुद्धा वाढविणार आहे.या वेळ वाढल्याने दारुची विक्री जास्त होऊन महसुलात भर होणार आहे.
यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इतर अधिकाऱ्यांन सोबत बैठक घेतली. या बैठकीत चंद्रपूर जिल्ह्यातील कराबाबद देखील माहिती घेण्यात आली. सध्या सुरु असलेली दारूबंदीमुळे किती महसूल बुडत आहे यावर देखील नजर टाकण्यात आली. चुकीची अंबलबजावणी आणि बुडत असलेल्या महसुलावर नजर टाकत मंत्री मंडळात यावर निर्णय घेण्यात येऊ शकतो,मंत्री मंडळाच्या समतीनंतर म्हणजेच बैठकीत प्रस्ताव पारित झाल्यानंतरच चंद्रपूरची दारू बंदी उठू शकते.
याचा दारूबंदीवरून चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी देखील खासदार म्हणून निवडून आल्यानंतर चंद्रपूरची दारूबंदी उठवावी अशी मागणी केली होती.
चंद्रपूर जिल्ह्य़ात संपूर्ण दारूबंदी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होताच जिल्हाभरातील महिलांनी गावागावात व चौकाचौकात एकत्र येऊन साखर, लाडू व पेढे वाटून ढोलताशे, डिजेच्या तालावर गुलाल उधळून, फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदोत्सव साजरा केला होता. दारूबंदी उठणार या बातमीमुळे चंद्रपूरकरांच्या चेहऱ्यावर वेगळीच लाली आली आहे. त्यामुळे ठाकरे सरकारचा हा निर्णय चंद्रपूरकरांना किती आनंदी करतो,तसेच चंद्रपूरची दारूबंदी उठवणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले राहणार आहे.