चंद्रपूर/प्रतिनिधी:
उद्योजकता विकास केंद्र एमसीईडी ही उदयोग संचालनालय अंतर्गत कार्यरत व महाराष्ट्र शासन पुरस्कृत स्वायत्त प्रशिक्षण संस्था असून, या संस्थेचा मुख्य उद्देश विविध प्रकारचे प्रशिक्षण आयोजित केलेले आहे. जास्तीत जास्त लोकांना स्वतःचा उद्योग - व्यवसाय सुरु करण्याकरिता प्रेरित करणे व उद्योजकतेला पूरक असे वातावरण निर्मिती करणे हा आहे. महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र चंद्रपूर द्वारे दहावी पास व 18 वर्ष पूर्ण असलेल्या युवक - युवतीकरिता 21 दिवसाचे कालावधीचे सुरक्षा रक्षक व माळीकाम प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. प्रशिक्षणात सिक्युरिटी उद्योगाची ओळख, प्रायव्हेट सिक्युरिटी, सव्हाइलंस सिस्टम, प्रायव्हेट सिक्युरिटी आणि इव्हेस्टिगेटिव्ह अक्ट, बेसिक सिक्युरिटी प्रोसिजर, बेसिक फायर फायटिंग इमर्जनजी रिस्पॉन्स प्रिपरेशन, कॅनेडियन लीगल सिस्टीम, लीगल अथॉरिटीज, इफेक्टिव्ह कॅम्युनिकेशन, सेन्सिटिव्ह ट्रेनिंग, युज ऑफ थेअरी, रिपोर्ट रायटिंग, रेस्पिशन सिस्टीम, हेल्थ अँड सेफ्टी ड्रिल परेड, इमर्जंसी लेव्हल फस्ट एड सर्टिफिकेशन ई.विषयावर मार्गदर्शन पसारा अक्ट 2007 नुसार मार्गदर्शन इत्यादी विषयावर विशेष तज्ञ व शासकीय अधिकारी वर्गाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षणात प्रवेश घेण्याकरिता इच्छुक युवक - युवतींनी 21 डिसेंबर प्रयन्त महाराष्ट्र उदोजकता विकास केंद्र उदयोग भवन, चंद्रपूर शैक्षणिक कागदपत्रासह उपस्थित रहावे.
संपर्क करा
प्रकल्प अधिकारी के.व्ही. राठोड सर 94030787773
कार्यक्रम आयोजक एल. खोब्रागडे मॅडम 9309574045