नागपूर/प्रतिनिधी:
नागपूर उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महानगर पालिकेच्या वतीने एकात्मिक रस्ते विकास योजनेत रस्त्याच्या मधोमध येणाऱ्या वीज वाहिन्या आणि विजेचे खांब स्थानांतरित करण्याचे काम सुरु आहे.
या अंतर्गत शुक्रवार दिनांक १७ जानेवारी २०२० रोजी सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत संत्रा मार्केट, कॉटन मार्केट, बाजेरिया, घाट रोड, राणी भोसले विहार येथील वीज पुरवठा बंद राहणार आहे.