२६ व्या विदर्भ पर्यावरण परिषदेचे थाटात उद्घाटन
विद्यार्थ्यांसह पर्यावणप्रेमींची उपस्थिती
चितेगाव (मूल)/ प्रतिनिधी
विदर्भ पर्यावरण परिषद, श्रमिक एल्गार तथा एल्गार प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित तीन दिवसीय विदर्भ पर्यावरण परिषदेचे उद्घाटन थाटात पार पडले.
यावेळी व्यासपीठावर ग्रीन प्लॅनेट सोसायटीचे अध्यक्ष, तथा पर्यावरण तज्ञ डॉ . सुरेश चोपणे, पुणे जेष्ठ सुक्ष्मजीवशास्त्रज्ञ, उत्कांतीशास्त्र तथा वर्तनशास्त्र अभ्यासक डॉ . मिलींद वाटवे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रदेश संघटक हरिभाऊ पाथोडे, स्वागताध्यक्ष विजय सिद्धावार ( उपाध्यक्ष, श्रमिक एल्गार ) आयोजक अॅड . पारोमिता गोस्वामी ( संस्थापिका श्रमिक एल्गार ) डॉ . जयश्री कापसे - गावंडे (अध्यक्ष, एल्गार प्रतिष्ठान ) यांच्या हस्ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा स्मृतीचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रदेश संघटक हरिभाऊ पाथोडे यांचा यावेळी शाल- श्रीफळ, स्मृतीचिन्ह देऊन विशेष सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना प्रा. पाथोङे यांनी आपल्या जीवनातील पर्यावरणीय दृष्टीकोन समजावून सांगितला. पर्यावरण ही चळवळ होण्याची गरज आहे. कागद, ऊर्जा यांचा गरजेपेक्षा अधिक वापर टाळण्याचे मनावर घेेेण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी अॅङ. पारोमिता गोस्वामी यांनी जंगलावर निर्भर असणारा ग्रामीण माणूस आणि शहरी शिक्षित पर्यावरण प्रेमी यांच्यात एकमेकांविरोधी संघर्ष होण्याची भीती व्यक्त केली. ग्रामीण लोकांच्या सहकार्याशिवाय पर्यावरणाचे रक्षण शक्य नाही. शिकारी येणार नाहीत शिवाय वन्यजीवाकङून शेतीला होणारा त्रास कमी कसा करता येईल, यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे, असे आवाहन केले.
26 व्या विदर्भ पर्यावरण परिषदेत आयोजन समितीच्या वतीने श्रमिक एल्गार संघटनेच्या कार्याचा आढावा महासचिव घनश्याम मेश्राम यांनी घेतला.
पर्यावरण परिषदेची भूमिका समन्वयक लोकमित्र संजय काशिनाथ सोनटक्के मांडली. कार्यक्रमाचे संचालन प्रभाकर पुसदकर यांनी केले.
परिषदेत शनिवारी
- दुसर्या दिवशी शनिवार दिनांक 11 जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता पहिल्या सत्राचा प्रारंभ होईल. यात परिवर्तन , विकास आणि पर्यावरण यावर - प्रा . प्रभाकर पुसदकर , समन्वयक ( नई तालीम समिती - सेवाग्राम ) हे मांडणी करतील.
- दुसरे सत्र - सकाळी ११ वाजता विकास नीती आणि जनमानस यावर मोहन हिराबाई हिरालाल ( वृक्षमित्र , चंद्रपूर ) भाष्य करतील.
- तिसरे सत्र - दुपारी २.३० वाजता स्त्रीवादी दृष्टीकोनातून वंचितांचे पर्यावरणीय प्रश्न - यावर प्रा . श्रीमती धम्मसंगिनी रमागोरख मार्गदर्शन करतील. सायंकाळी ४.३० वाजता परिवर्तन , विकास आणि स्थानिकांचे पर्यावरणीय प्रश्न यावर प्रा. डॉ. योगेश दुधपचारे, तर चंद्रपूर गोसेखुर्द प्रकल्प : पर्यावरणीय समस्या आणि सद्यास्थिती यावर अॅड . गोविंद भेंडारकर मांडणी करतील.
- रात्री ८ . ३० नंतर - मुक्त चर्चा व स्वानुभव कथन होईल.