Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, जानेवारी १६, २०२०

नागपूर:पतीने केली पत्नीची खलबत्याच्या बत्याने ठेचून हत्या

संशयावरून निर्माण झाला वाद 
डॉ.आंबेडकरनगरमधील घटना
नागपूर : अरूण कराळे 

वाडी येथील डॉ.आंबेडकर नगरमध्ये संशयीत पतीने आपल्या पत्नीचे खलबत्त्याच्या बत्त्याने हत्या केल्याची घटना बुधवार  १५ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास  घडली.
सिद्धार्थ  सोनपिपळे यांचा पहील्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्यामुळे  अलका टेभेंकर (सोनपिपळे) ही सिध्दार्थ सोबत लग्न न करता राहत होती.

अलका सोनपिपळे  (टेंभेकर) वय २८ वर्षे असे मृत पावलेल्या पत्नीचे नाव असून पती आरोपीचे नाव सिद्धार्थ प्रेमजी सोनपिपळे वय ३५ वर्ष असे आहे. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या  माहितीनुसार डॉ.आंबेडकर नगर मधील सम्राट अशोक चौकात  राहणाऱ्या आरोपी सिद्धार्थ प्रेमजी सोनपिंपळे यांना रात्री पत्नी घरी दिसली नाही. पतीला न सांगता उशिरापर्यंत बाहेर कोठेतरी गेली होती. सिद्धार्थला मात्र वेगळाच संशय आल्याने तो आगबंबाळ झाला होता. पत्नी अलका ही जेव्हा रात्री उशिरा घरी परतली तेव्हा रागाच्या भरात असलेल्या सिद्धार्थने आपली पत्नी अलका ही रात्री घराबाहेर कुठे गेली होती? या कारणावरून तिच्याशी वाद घातला.वाद वाढत गेला.राग अनावर झाल्याने सिद्धार्थने घरातील स्वयंपाक घरात असलेली लोखंडी खलबत्त्याचा बत्ता उचलला आणि पत्नी अलकाचा कपाळावर मारला .लोखंडी बत्ता लागताच रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या.


सिद्धार्थ एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पत्नीच्या डोक्यावर, तोंडावर, पोटावर लाथा मारून जीवनीशी  ठार मारले. तो घाबरून घरून पळून गेला. दिवसभर दारुपिऊन इकडे तिकडे फिरत राहिला. नशा उतरतात रात्री दहा वाजता दरम्यान वाडी पोलीस स्टेशन येथे हजर राहून घटनेची माहिती पोलीस स्टेशनला दिली. घटनेची शहानिशा करण्यासाठी घटनास्थळी पोलिस पोहचले. घटनास्थळी डीसीपी विवेक मासाळ,एसिपी सिद्धार्थ शिंदे,पीआय राजेंद्र पाठक,पीएसआय अमोल लाकडे पोहोचले.त्यानंतर घटनेचा पंचनामा केला.याप्रकरणी वाडी पोलीस स्टेशन येथे आरोपी विरुद्ध कलम ३०२ ,२०१ भादवी अन्वये गुन्हा नोंदवून आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.