नागपूर/ प्रतिनिधी
पद्मगंधा प्रतिष्ठान नागपूर च्या मासिक कार्यक्रम अंतर्गत नुकताच सरस्वती मंदिर राम नगर महिला समाजा त "जगी या खास वेड्यांचा....." हे मुक नाट्य सादर करण्यात आले. ना दिष्ट पणाला विनोदी अंगाने उलगडून दाखवणारं हे मुक नाट्य. एखादा ध्यास लागला की माणूस त्याने प्रभावित होतो आणि सतत तीच तीच गोष्ट करत राहतो. जगाच्या दृष्टीने तो वेडा ठरतो पण त्याला त्याची अजिबात जाणीव नसते. संगीत,योग, वाचन, खेळ, दागिने,सौंदर्य स्पर्धा,असे नानाविध छंद माणसाला त्यातही स्त्रीला ग्रासून टाकतात आणि मग तिला वेडी आहे असं जग म्हणतं. अशा या वेड्यांचा पसारा आपल्याला आपल्या घरात, समाजात सगळीकडे दिसतो आणि मग आपल्याला जाणवतं की ते वेड नाही तर तो एक ध्यास आहे या मुक नाट्यात अशाच एका ध्यासाने प्रभावित झालेल्या दहा मनस्वी पात्रांचा वेध घेतला आहे.या वेळी दीप प्रज्वलन राम नगर महिला समाजा च्या अध्यक्ष अनुराधा कुऱ्हे कर यांनी केले. मुक नाट्याची संकल्पना आणि लेखन डॉ अंजली पार नंदी वार यांनी केले होते तर विशेष सहाय्य प्रभा देऊसकर यांचे होते. रामनगर महिला समाजा च्या अनुराधा कुऱ्हेक र, वीणा भारद्वाज,माधुरी मोहगाव कर , शर्वि ल व्यवहारे, अलका पन कं टी वार , भाग्य रेखा सदावर्ते, राधा ढो क , रश्मी रानडे, पल्लवी मांडे,प्रभा देऊसकर, आणि अंजली पार नंदी वार यांनी यात सहभाग घेतला.सूत्र संचालन संगीता वाईकर यांनी केले तर आभार प्रदर्शन स्वाती मोहरीर यांनी केले.