शिरीष उगे/भद्रावती
संसदेमधे पहील्यांदाच महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार असलेले सुरेश उर्फ बाळुभाऊ धानोरकर यांनीचंद्रपुर औष्णीक केंद्रातील प्रदुषणाचा मुद्दा लावुन धरल्यामुळे नागरीकांना आनंद वाटत असतांना,धानोरकर यांचे राजकीय विरोधक मात्र त्यांनी उदाहणार्थ दिलेल्या माहीती द्वारे चुकीची माहीती दिल्याचा अपप्रचार करीत आहे. आणि त्याद्वारे प्रदुषण सारखा महत्वाचा मुद्दा मागे पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. चंद्रपुर प्रदुषणाची खाण असल्याचे वेळोवेळी निर्दशात आणुनही कोणीही याची दखल घेत नाही. इथल्या नागरीकांना अनेक आरोग्यविषयक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मागील पंचवीस वर्षापासुन इथे भाजपचे प्रतिनीधी होते पण कोणीही हा विषय लावुन धरला नाही. आधीतर मुनगंटीवार हे युती सरकारमधे पर्यावरण मंत्री होते आणि नंतर वन मंत्री, आणि जिल्ह्याचे पालकमंत्री पण त्यांनी कधीही हा विषय मनावर घेतला नाही. त्या सोबतच हंसराज अहीर हे देखील पंधरा वर्ष खासदार असुनही त्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला नाही. पण सहा महीने ही झाले नाही तरी बाळु धानोरकर यांनी हा विषय लोकसभेत मांडला. नागरीकांमधे त्यांच कौतुक होत असतांना लागोलाग अनेक लोकांनी चुकीची माहीती दिली असा अपप्रचार सुरु केला. जेव्हा की त्यांनी संच एक आणि दोन एवढे मानक प्रदुषण करायचे हे उदाहरण दाखल सांगितले होते. पण केवळ हे भाषण नीट न ऐकता, त्यांनी मांडलेल्या विषयाचं गार्भीर्य कमी करण्यासाठी त्यांचा अपप्रचार केल्या जात आहे. अस असलं तरी हा विषय सातत्याने मांडुन सरकारकडुन कार्रवाईची मागणी करणार असल्याचे खासदार सुरेश उर्फ बाळुभाऊ धानोरकर यांनी स्पष्ट केलं आहे.