महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनच्या लढ्याला यश
नागपूर - नोव्हेंबर २००५ पासून सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठीची वाटचाल सकारात्मक दिशेने असून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या आंदोलनाला भक्कम पाठबळ मिळत आहे.
न्यायालयीन कर्मचारीवर्गाला जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात आदेश पारित झाल्यानंतर सर्व संवर्गातील नोव्हेंबर २००५ पासून सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी अशी दाट अपेक्षा व्यक्त झाली. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेने गेल्या पाच वर्षांतील आक्रमक आंदोलनामुळे हा विषय आता सर्वच आमदारांना तोंडपाठ झाला आहे. जुनी पेन्शन योजना लागू व्हावी याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्य अध्यक्ष वितेश खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अर्थमंत्री जयंत पाटील, विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, गृहमंत्री एकनाथ शिंदे या मंत्री महोदयांची भेट घेतली. या सोबतच आ. अजित पवार, आ. बच्चू कडू, आ. सुलभाताई खोडके, आ. रोहित पवार, आ. दिलीप वळसे पाटील, आ. बबनराव पाचपुते, आ. नवाब मलिक, आ. जितेंद्र आव्हाड, आ. धीरज देशमुख, आ. अनिल पाटील, खा. उन्मेषदादा पाटील, आ. आशिष जयस्वाल, आ. कपील पाटील, आ. देवेंद्र भुयार, आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या भेटीं घेऊन त्यांना हा मुद्दा मार्गी लावण्याची विनंती केली.
या भेटीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तरासह पुढील वेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेला बोलाविले आहे. तर विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सचिवस्तरावर संघटना व सचिव यांनी बैठक लावण्याचे सुतोवाच दिला आहे. यामुळे पुन्हा एकदा पेन्शन विहीन कर्मचाऱ्यांच्या आशा बळावल्या आहेत. या चार दिवसांच्या संपूर्ण भेटित महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, राज्यसचिव गोविंद उगले, कार्याध्यक्ष रावसाहेब सुतार, नागपूर विभागीय अध्यक्ष आशुतोष चौधरी, सल्लागार सुनील दुधे, विश्वस्त नदिम पटेल, शैलेश राऊत, कुणाल पवार, अमोल शिंदे, नवनाथ धांडोरे, मनीषा मडावी, अमरावती जिल्हाध्यक्ष गौरव काळे, राज्य उपाध्यक्ष नामदेव मेटांगे, नदिम पटेल, अमरावती विभाग सचिव कासीम जमादार, प्रज्वलदादा घोम, गडचिरोली जिल्हाध्यक्ष गुरूदेव नवघडे , बापु मुनघाटे, बाळासाहेब लोखंडे, भंडारा जिल्हाध्यक्ष संतोष मडावी , चेतन बोरकर, श्री मेश्राम, विनोद किंडर्ले, लखन साखरे, वर्धा टीमचे हेमंत पारधी, सुरज वैद्य, नागपुर टीमचे जिल्हा अध्यक्ष अनिल वाकडे व जिल्हा उपाध्यक्ष पुरूषोत्तम हटवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.