Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

गुरुवार, डिसेंबर २६, २०१९

महानिर्मिती आंतरगृह क्रीडा स्पर्धा २०१९-२०२० चे शानदार समापन


नागपूर/प्रतिनिधी:
खेळामधून कर्मचा-यांच्या अंतर्गत गुणांना वाव मिळून सांघिक भावना रुजविण्याचा हेतू असून यामुळे उत्तम आरोग्य राहून पर्यायाने वीज उत्पाद्नासारख्या राष्ट्रीय कार्यास हातभार लागत असल्याचे प्रतिपादन पारस वीज केंद्राचे मुख्य अभियंता डॉ. रवींद्र गोहणे यांनी केले. ते महानिर्मितीच्या तीन दिवसीय आंतरगृह क्रीडा स्पर्धेच्या पारितोषिक समारंभात बोलत होते.

समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस उप अधीक्षक डॉ. रोहिणी तात्यासाहेब सोळंके, डॉ. नंदकिशोर माहेश्वरी बालरोग तज्ञ व फॅमिली फिजिशियन अकोला, चित्रपट निर्माते प्रशांत मानकर प्रामुख्याने उपस्थित होते तर सोहळ्याचे अध्यक्षस्थान मुख्य अभियंता डॉ. श्री.रविंद्र गोहणे यांनी भूषविले.

याप्रसंगी चित्रपट निर्माता प्रशांत मानकर यांनी महानिर्मितीच्या खेळाच्या दर्जाचे गौरव करीत राष्ट्रीयस्तरावर नेतृत्व करण्याचे खेळाडुंना आवाहन केले. डॉ. रोहिणी सोळंके म्हणाल्या कि,आज महिला पुरुषांपेक्षा कुठल्याही क्षेत्रात कमी नाहीत त्यामुळे महिलांनी अश्या स्पर्धेत अधिकाधिक सहभाग वाढवून आपले स्वास्थ्य सुदृढ ठेवावे. 

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे 
विजेता वीज केंद्र संघ 
 बॅटमिंटन सांघिक - महिला (खापरखेडा), पुरुष(कोराडी) 
 टेबल टेनिस सांघिक महिला(भुसावळ), पुरुष (पोफळी)
 बुद्धिबळ स्पर्धा – महिला व पुरुष (चंद्रपूर)
 कुस्ती स्पर्धेमध्ये नवकरणीय उर्जा 
 ब्रिज सांघिक (परळी),पेयर प्रोग्रेसिव (नाशिक)
 कॅरम महिला (भुसावळ), पुरुष (चंद्रपुर) 

कुस्ती स्पर्धेमध्ये ५७ किलो गट, ६१ किलो गट, ६५ किलो गट, व ७० किलो गट विजेते पद नवकरणीय उर्जा, कुस्ती ७४ किलो गट विजेते पद कोराडी औ.वि.केंद्र, कुस्ती ८६ किलो गट विजेते पद परळी औ.वि.केंद्र, कुस्ती ९७ किलो गट विजेते पद पारस औ.वि.केंद्र, कुस्ती खुला गट विजेते पद भुसावळ औ.वि.केंद्र यांनी पटकाविले.

स्पर्धेचे यजमान औ.वि.केंद्र, पारस संघाने बुद्धिबळ उपविजेते पद, कॅरम दुहेरी उपविजेते पद, विजय गिर्हे यांनी ९७ वयोगटात कुस्ती या स्पर्धेत विजेतेपद, वैशाली माने यांनी बुद्धिबळ स्पर्धेत उपविजेते पद,संदीप धुर्वे व रौम्म शेख यांनी कॅरम दुहेरीमध्ये उपविजेते पद मिळविले.

२३ डिसेंबर रोजी खेळाडूंसाठी सांस्कृतिक कार्यक्रम व स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. ज्यामध्ये प्रकाश सलामे व प्रीती कोल्हे यांच्या संचलनामध्ये कराओके गीतांच्या सुमधुर कार्यक्रमाचा प्रत्येकाने मनसोक्त आनंद लुटला. कार्यक्रमाचा शेवट हा “सोहळा हा खेळांचा, मनांच्या मेळांचा” ह्या रविंद्र गोहणे , संदीप पळसपगार ह्यांनी गायलेल्या स्फूर्ती गीतावर सर्व संघांचा सामुहीक जंबल मार्चद्वारे करण्यात आला. 

समारोपीय कार्यक्रमाला उपमुख्य अभियंता रुपेंद्र गोरे,जयश्री रविंद्र गोहणे,चंदना रुपेंद्र गोरे, अधीक्षक अभियंता ज्ञानेश्वर दामोदर,भास्करराव इंगळे, नरेश राउत, उपमुख्य औदयोगीक संबंध अधिकारी पुरुषोत्तम वारजुरकर व मुकेश मेश्राम तसेच विविध विभाग प्रमुख, अधिकारी कर्मचारी व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्रिडास्पर्धेचे अहवालवाचन,मार्च पास्ट तसेच ध्वजारोहणाचे संचालन उपमुख्य औदयोगीक संबध अधिकारी पुरुषोत्तम वारजुरकर यांनी केले.जिल्हा क्रिडा अधिकारी आसाराम जाधव व विविध जिल्हा खेळ असोशिएशनच्या क्रिडा साहित्य व पंचांच्या योगदानाद्वारे स्पर्धा यशस्वीरीत्या संपन्न झाल्या.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अदिती धाराशिवकर, मयुर मेंढेकर यांनी तर आभार प्रदर्शन मयुर मेंढेकर कल्याण अधिकारी यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता नॅशनल मिलीटरी स्कूल गायगावचे बँड पथक, महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय पारसच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लेझीम व मोनोर्यान बरोबरच सचिन भागेवर कार्यकारी अभियंता, पटीये कार्यकारी अभियंता स्थापत्य, रविंद्र घिके कार्यकारी अभियंता स्थापत्य, विनोद अरबट कार्यकारी अभियंता, डॉ. मावळे, डॉ. राजेश तायडे, सतिश ठाकरे उप कार्यकारी अभियंता, विक्रम तराळे उप कार्यकारी अभियंता, अमोल भाकरे सहायक अभियंता सर्व खेळ प्रकार समन्वयकांसोबत राजश्री खंडारे, सतीश चावरिया व दिलीप पतोडे यांनी परिश्रम घेतले.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.