Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, डिसेंबर २४, २०१९

जुन्नर तालुक्यात सुरू झाली बिन भिंतीची शाळा




जुन्नर /आनंद कांबळे 
जुन्नर तालुक्यात पंचायत जुन्नर समितीच्या शिक्षण विभागामार्फत बिनभिंतीच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. 
 प्रत्येक मुलाला शिक्षणाचा अधिकार प्राप्त झाला पाहिजे या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी जुन्नर तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी  पी.एस.मेमाणे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर तालुक्यात बिनभिंतीची शाळा ही संकल्पना मागील वर्षापासून राबवली जात आहे.
               नोव्हेंबर ते एप्रिल  या कालावधीमध्ये जुन्नर तालुक्यात अनेक ठिकाणी  ऊसतोड कामगारांचे ऊस तोडणी करता औरंगाबाद, नाशिक, जळगाव ,धुळे ,जालना इत्यादी जिल्ह्यांमधून स्थलांतर होत असते. ऊस तोडणीसाठी ही कुटुंबे आपल्या मुलांना घेऊन जुन्नर तालुक्यात येत असतात. याकाळात ऊसतोड कामगारांच्या मुलांचे शिक्षण मध्येच थांबले जाते. 

भाषेची अडचण, घरातील लहान मुलांचा सांभाळ,घरगुती कामे, शैक्षणिक साहित्याचा अभाव इत्यादी कारणांमुळे ही मुलगी शिक्षण प्रवाहापासून दूर राहतात. या मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी गटशिक्षणाधिकारी मेमाणे साहेब यांनी बिनभिंतीची शाळा ही संकल्पना जुन्नर तालुक्यात राबवली आहे.

             यानुसार तालुक्यातील सर्व विभागाचे सर्वेक्षण करून ऊस तोडणी कामगारांच्या मुलांचा शोध घेण्यात आला व या मुलांच्या शिक्षणासाठी ते ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

यासाठी डीएड, पदवी पर्यंत शिक्षण घेतलेल्या स्वयंसेवकांची नेमणूक करून त्यांच्या मानधनासाठी विघ्नहर सहकार साखर कारखाना यांचे सहकार्य घेण्यात आले आहे. हे स्वयंसेवक सायंकाळी चार ते सहा या वेळेमध्ये दररोज या मुलांना अध्यापनाचे काम करत आहेत.
                    सध्या जुन्नर तालुक्यात अशाप्रकारच्या बिनभिंतीच्या शाळा खोडद, शिरोली (बोरी) येथील वडमाळ वस्ती इत्यादी ठिकाणी सुरू करण्यात आल्या आहेत.अनुक्रमे दिनांक 20.डिसेंबर रोजी खोडद व 23 डिसेंबर रोजी शिरोली( बोरी) येथील बिनभिंतीची शाळा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सुरू करण्यात आली आहे.या वर्गात  18 मुले शिक्षण घेत आहे. यावेळी शिरोली बोरी गावचे  सरपंच जयसिंगशेठ गुंजाळ ,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजुशेठ पोळ, ग्रामपंचायत सदस्य बाबाजी सहाने ,पालक वर्ग ,केंद्र प्रमुख बोरकर सर , देठे सर ,राजु जाधव इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
गटशिक्षणाधिकारी पी.एस मेमाणे यांनी  या  वर्गातील मुलांशी हितगुज करून दररोज शाळेत येण्याचे आव्हान केले व या मुलांना पहिल्या दिवशी खाऊ वाटप करून मुलांचे स्वागतही केले.

              खरेतर प्रत्येक मुल शिकले पाहिजे यासाठी साहेबांच्या असणारी धडपड पाहून एक ध्येयवेडे व्यक्तिमत्व अनुभवयास येत आहे. मागील वर्षी खोडद याठिकाणी अशीच बिनभिंतीची शाळा सुरू होती याही वर्षी याठिकाणी बिनभिंतीची शाळा सुरू करण्यात आली.  येथे 17 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. 
                असे वर्ग सुरू करून चालवण्यासाठी शिरोली( बोरी) शाळेचे मुख्याध्यापक माणिक पळसकर व खोडद शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता गायकवाड  यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. 

       या मुलांच्या सर्वेक्षणासाठी साखर शाळेतील उपशिक्षक संतोष डुकरे,नंदाराम टेकवडे,दीपक मुंढे यांनी सहकार्य केले.ही मुले शिक्षणाच्या प्रवाहात ठिकाण टिकून राहिली पाहिजे, यांच्या मनांमध्ये असणारी शाळेची गोडी कायम राहीली पाहिजे यासाठी अनेक सामाजिक संस्था शैक्षणिक साहित्यासाठी पुढाकार घेत आहे.




या विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेसाठी दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान पुणे यांच्यामार्फत ब्लॅंकेट उपलब्ध करून देण्यात आली यासाठी  संजय डुंबरे यांचे विशेष सहकार्य लाभले. दुर्ग प्रतिष्ठानचे अध्यक्ष  संतोष जाधव व सर्व टीम यांचे आभार मानले.      
                      अशाच प्रकारची बिनभिंतीची शाळा आणखी काही ठिकाणी सुरू करण्याची सुरू करण्याचा मानस असून लवकरच हे वर्ग सुरू होणार आहेत. या उपक्रमामुळे ऊसतोड कामगारांच्या मुलांचा शिक्षणाचा प्रश्न थोड्या कालावधीसाठी का होईना मार्गी लागेल.साहेबांच्या माध्यमातून स्थलांतरित मुलांच्या शिक्षणासाठी *एक हात मदतीचा* खऱ्या अर्थाने पुढे करण्यात आलेला आहे. सर्व शिक्षक वृंदांनी या मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी सहकार्य करावे अशी भावनाही मेमाणे यांनी  व्यक्त केली.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.