पाथरी/ प्रतिनिधी
सावली तालुक्यातील जि प उच्च प्राथ शाळा चिचबोडी येथे मॅजिक बस इंडिया फॉउंडेशन "नेस्ले हेल्दी किड्स"कार्यक्रमाला दोन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तालुक्यातील सर्व पालक व बालक मनोगत कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमात पालकांना व बालकांना या दोन वर्षामध्ये काय बदल झाले या विषयी मनोगत घेण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी उदघाटक मा.श्री लोमेश पा डबले सरपंच ग्रा प चिचबोडी,अध्यक्ष मा श्री प्रशांत लोखंडे मॅजिक बस जिल्हा कार्यक्रम अधिकारी चंद्रपुर,प्रमुख अतिथी श्री संदीप राऊत मॅजिक बस जिल्हा प्रशिक्षण अधिकारी,केवळराम नैताम पो पा चिचबोडी, सोरते मुख्याध्यापक चिचबोडी,सौ रंजनाताई रोहनकर उपाध्यक्ष शा व्य समिती, श्री प्रमोद महाडोळे,सुनंदा रतन डबले सदस्य शा व्य स,विद्याताई बंडुजी झाडे सदस्य ग्रा प चिचबोडी, पालक-बालक व सर्व सी वाय एल उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उदघाटक श्री लोमेश पा डबले यांनी आपल्या भाषणात मार्गदर्शन करतांना सांगितले की,तालुक्यातील पालक व बालक यातील बदल हा मॅजिक बस मुळे होत आहे मॅजिक बस चा कार्यक्रम सावली तालुक्यात असाच कायम ठेवून समाजाला घडविण्याचा काम करीत राहावे आणि मॅजिक बस मुलांचा विकास करण्याचा काम करीत आहे आणि प्रत्येकांनी या कार्याला सतत पुढे न्यावे. मा.प्रशांत लोखंडे यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले की,मॅजिक बस मुलांना घडविण्याचा व त्यांना त्यांच्या ध्येयापर्यन्त पोहचविण्याचा काम करीत आहे.मुलांसोबत व समाजासोबत कसे काम करतो या करीता पालकांचे,शा व्य समिती सोबत सत्राचे आयोजन करीत असते.म्हणून सर्वानी मॅजिक बस कार्यक्रमाला सहकार्य करावे.
मॅजिक बस इंडिया फॉउंडेशन "नेस्ले हेल्दी किड्स व जे पी मॉर्गन" कार्यक्रम सावली तालुक्यातील एकतीस गावात "खेळाच्या माध्यमातून विकास व बालपण ते उदरनिर्वाह" या कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य,स्वच्छता,चांगल्या पोषणाच्या सवयी,शिक्षणाचे महत्व,स्त्री-पुरुष समानता,खेळण्याचा अधिकार,जीवन कौशल्य व सामाजिक भावनिक शिक्षण या कार्यक्षेत्राला घेऊन अकरा ते चौदा वयोगटातील मुलांना मार्गदर्शन करीत आहे.
हा कार्यक्रम मॅजिक बसचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनातून व तालुका मार्गदर्शक योगिता सातपुते यांच्या सहकार्यांने संदिप राऊत जिल्हा प्रशिक्षण अधिकारी यांच्या सहकार्याने घेण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन युवा मार्गदर्शक लेखाराम हुलके, प्रास्ताविक योगिता सातपुते तालुका समन्वयक यांनी केले,विशेष सहकार्य युवा मार्गदर्शक वसंत पोटे, नंदकिशोर पाल तर आभार प्रदर्शन युवा मार्गदर्शक देवाजी बावणे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मॅजिक बस कर्मचारी,सी वाय एल अनिकेत बावणे व इतर सी वाय एल,शिक्षकवृंद,पालक,बालक,गावातील नागरिक व शा व्य समिती यांच्या सहकार्यांने घेण्यात आला।