नागपूर/ प्रतिनिधी
"स्नेहसंमेलन हा विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना प्रकाशित करणारा सांस्कृतिक कृतिकार्यक्रम असतो. म्हणून प्रत्येकच शाळेत स्नेहसंमेलनाचा वार्षिक महोत्सव साजरा होण्याची गरज आहे" असे प्रतिपादन संस्थाध्यक्ष मा. दिलीप पनकुले यांनी केले. ते माँ. वैष्णवी शिक्षण संस्था द्वारा संचालित शांती विद्या भवन शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, डिगडोह, नागपूर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमात अध्यक्ष या नात्याने बोलत होते. संस्थेच्या कोषाध्यक्षा डॉ. सुषमाताई पनकुले यांनी "विद्यार्थी हा शक्यतांचा पुंजका असतो. विद्यार्थ्यांमधील शक्यता हुडकून काढून त्या शक्यतांना प्रज्वलित करणे यासाठी स्नेहसंमेलनाच्या सोहळ्याचा मुख्य उद्देश असतो" असे मत आपल्या उद्घाटकीय चिंतनातून त्यांनी मांडले. तसेच प्रमुख अतिथी सौ. रश्मी काळबांडे, सरपंच, डिगडोह (देवी), प्राचार्य, देविदास घोडे, श्री. सोपानराव शिरसाट, सचिव, संग्राम पनकुले, डॉ. नेहा पनकुले यांचीही या प्रसंगी मार्गदर्शनपर भाषणे झाली.
उद्घाटनानंतर पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक मराठी, हिंदी व इंग्रजी विभागाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलात्मक सांस्कृतिक कार्यक्रमात भारतीय लोकसंस्कृतीचे, लोकजीवनाचे व जीवनशैलीचे मनोज्ञ दर्शन घडले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुक्रमे श्री. घोडे सर, श्री. शंभरकर सर, सौ. चैताली खेडकर आणि सौ. रीता महाजन यांनी केले. तर उद्घाटकीय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शुभांगी पनकुले यांनी केले आणि आभार सौ. जाधव मॅडम यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. प्रकाश राठोड, मुख्याध्यापिका सौ. अनिता फ्रांसीस, सौ. ममता ढोरे, कल्पना वादाफळे आणि पर्यवेक्षिका श्रीमती प्रगती कथलकर यांनी व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकवर्गाची हजारोच्या संख्येत उपस्थिती होती.