Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

रविवार, डिसेंबर १५, २०१९

सीएमआरएस' ने केली झाशी राणी मेट्रो स्टेशनची पाहणी




मेट्रो स्टेशन कामाबद्दल CMRS ने व्यक्त केले समाधान


नागपूर-  हिंगणा मार्गावरील(रिच ३ – अँक्वा लाईन) मेट्रो प्रकल्पाच्या कार्याचे परीक्षण करण्यासाटी मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस), दिनांक १३ डिसेंबर रोजी नागपुर येथे पोहचले. श्री. गर्ग यांनी (रिच ३ – अँक्वा लाईन) अंतर्गत असलेल्या झाशी राणी मेट्रो मेट्रो स्टेशनची पाहणी केली. ज्यामध्ये मेट्रो स्टेशनशी प्रवाश्यांकरता असलेल्या विविध सुविधांचे त्यांनी निरीक्षण केले. या पाहणी दरम्यान मॉक ड्रीलचे आयोजन देखील करण्यात आले होते. स्टेशन परिसरात करण्यात आलेल्या सोयी-सुविधाचा आढावा घेत सीएमआरएस पथकाने समाधान व्यक्त केले.

CMRS अधिकाऱ्यांनी आपला दौरा झाशी राणी मेट्रो स्टेशन येथून सुरु केला.  महा मेट्रोच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या झाशी राणी मेट्रो स्टेशनच्या निरीक्षणाची सुरवात तेथील एस्केलेटर पासून पथकाने केली. त्याच्याशी संबंधित विविध सुरक्षा नियमांची पाहणी त्यांनी केली. कुठल्याही संभाव्य आणीबाणीच्या परिस्थितीत करायच्या उपाय योजनांची समीक्षा देखील त्यांनी केली. 

श्री गर्ग आणि त्यांच्या सोबत असलेले श्री रिषभ द्विवेदी, CMRS पथकातील इतर अधिकारी, यांनी स्टेशन नियंत्रण कक्षाची आणि तेथील सोइ-सुविधांची देखील पाहणी केली. तेथे तैनात असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांशी त्यांनी चर्चा केली आणि मार्गदर्शन देखील केले.  

स्टेशनवरील विविध फलकाचे तसेच सुरक्षा उपकरणांचे निरीक्षण त्यांनी केले. या प्रसंगी CMRS अधिकाऱ्यांसमोर मॉक ड्रिलचे आयॊजन देखील करण्यात आले. आगीसारख्या आणीबाणीच्या परिस्थतीत नेमकी तयारी कशी असायला हवी याचे परीक्षण करण्याकरता या ड्रिलचे आयोजन करण्यात आले. या अंतर्गत अग्नीशमन गाडीसोबतच रुग्णवाहिकेला देखील पाचारण करण्यात आले. अपेक्षे प्रमाणे १० मिनिटातच दोन्ही वाहने `घटना स्थळी' दाखल झाले. या दरम्यान पंप रूमचे देखील निरीक्षण त्यांच्यातर्फे झाले.

या मॉक ड्रिल दरम्यान अग्नी शमन गाडी तसेच रुग्णवाहिका वेळेवर दाखल झाल्याने CMRS पथकाने नागपूर महानगर पालिका आणि लता मंगेशकर रुग्णालयाची प्रशंसा केली. महा मेट्रो कर्मचाऱ्यांची तत्परतेची दखल देखील या दोन्ही अधिकाऱ्यांनी घेतली.

या प्रसंगी संचालक (प्रकल्प) श्री महेश कुमार, संचालक (रोलिंग स्टोक आणी सिस्टीम) श्री सुनील माथूर, कार्यकारी संचालक (रिच-१) श्री देवेंद्र रामटेककर, कार्यकारी संचालक ( इलेक्ट्रिकल) श्री गिरिधारी पौनीकर, कार्यकारी संचालक ( सिग्नल) श्री जे पी डेहरीया, कार्यकारी संचालक (ट्रॅक) श्री नरेश गुरबानी, कार्यकारी संचालक (प्रशासन) श्री अनिल कोकाटे, महा व्यवस्थापक (O&M) श्री सुधाकर उराडे, महा व्यवस्थापक (टेलिकॉम) श्री आशिष संघी, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (रिच-३) श्री राजदीप भट्टाचार्य आणि इतर अधिकारी उपस्थितहोते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.