- दोन महिन्यांपासून पथदिवे बंद
- स्थानिक विज केंद्र प्रशासनाचे दुर्लक्ष
खापरखेडा/प्रतिनिधी
परिसरात असलेल्या भानेगाव उड्डाणपूल व सर्व्हिस रोड वरील पथदिवे मागील दोन महिन्यांपासून बंद आहेत मात्र अखत्यारित असलेल्या स्थानिक विज केंद्र प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष असल्यामुळे सदर उड्डाणपूल भानेगाव वासीयांसाठी यमदूत ठरणार काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे खापरखेडा औष्णिक विज केंद्राला कोळसा पुरविण्यासाठी भानेगाव ग्रामपंचायत हद्दीत सात रेल्वे ट्रॅक तयार करण्यात आले आहे त्यामुळे याठिकाणी वाहतुकीच्या दृष्टीकोनातून राष्ट्रीय महामार्गावर उड्डाणपूल तयार करण्यात आला आहे सदर उड्डाणपूल व सर्व्हिस रोड वरचे मागील दोन महिन्यांपासून बंद आहेत सदर उड्डाणपुल हा राष्ट्रीय महामार्गावर असल्यामुळे अनेक लहान मोठया जड वाहनांची सारखी वर्दळ असते पथदिवे बंद असल्याने अनेकदा अपघात घडले आहेत शिवाय मृत्यूच्या घटना सुद्धा घडल्या आहेत बंद असलेले पथदिवे पूर्वरत सुरू करण्यासंदर्भात भानेगाव ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने स्थानिक विज केंद्र प्रशासनाला पत्र देण्यात आले मात्र कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नाही पथदिव्यांना विज पुरवठा करणारा एक केबल निकामी झाल्याची माहिती मिळाली असून बंद असलेले पथदिवे त्वरित सुरू करावे अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा सुनील जालंदर, आशिष उपासे, राज तांडेकर, निलेश चिखले, राहुल भोयर, आकाश कुडवे, राहुल जालंदर, सौरभ चिंचुरकर,अमित शेंडे, सौरभ उपासे,चेतन वानखेडे आदिनी दिला आहे.