मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश
आम आदमी पार्टीच्या प्रयत्नांना यश
- अॅङ. पारोमिता गोस्वामी यांच्या निवेदनाची दखल
चंद्रपूर/प्रतिनिधी
ग्रामिण पाणी पुरवठा नळ योजनेतील कंत्राटी कामगारांना किमान वेतनाप्रमाणे पगार देण्याण्यात यावे, अशी सूचना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या आहेत.
आम आदमी पार्टी च्या नेत्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी शिष्टमंडळासोबत मुख्य कार्यकारी कार्डीले यांची भेट घेवून निवेदन दिले होते. आम आदमी पार्टीच्या प्रयत्नांना यश आले आहे.
ग्रामिण पाणी पूरवठा नळ योजनेतील कंत्राटी कामगारांना किमान वेतन ठेकेदारांकङून दिले जात नाही. कामगारांचे खात्यात पगार जमा करण्याचे शासन परीपत्रक असतांना कामगारांना नगदी चार पाच हजार रूपये पगार दिला जातो. अशा अनेक गंभिर बाबी गोस्वामी यांनी मूख्य कार्यपालन अधिकारी कार्डीले यांचे निदर्शनास आणून दिल्या. हे अत्यंत गंभीर असल्याचे कार्डीले यांनी मान्य केले. योजनेवर कार्यरत असणा - या कामगारांना नियमाप्रमाणे किमान वेतन मिळणे आवश्यक असल्याने त्यांना किमान वेतन अदा करण्याबाबत तसेच त्यांचे पगार त्यांचे खात्यात जमा करण्याची सूचना दिली. कामगारांना किमान वेतन इलेक्ट्रॉनिकली ( सरळ संबंधीताचे खात्यात जमा करणे ) देण्यात यावे , व त्याची पोच दरमहा न चुकता सादर करावी, अशी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद , चंद्रपूर यांनी दिली आहे.