- अज्ञात चोरट्यांनी दोन स्टेपन्या केल्या लंपास
- सुरक्षा यंत्रणेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह
खापरखेडा-प्रतिनिधी
स्थानिक औष्णिक विज केंद्राचे मुख्य कार्यालय सौदामिनी कार्यालय परिसरात मोठया प्रमाणात विज केंद्र व खाजगी कंपनीची सुरक्षा तैनात करण्यात आली आहे मात्र सुरक्षा व्यवस्थेला भेदून कार पुरवठा करणाऱ्या एका ट्रेडर्स कंपनीच्या कारच्या दोन स्टेपन्या अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्या असल्याची घटना नुकतीच घडली आहे मात्र यासंदर्भात पोलिसात तक्रार करण्यात आली नसल्यामुळे ''तेरी भि चूप मेरी भि चूप च्या अवस्थेत' ट्रेडर्स संचालक दिसून येत आहे खापरखेडा औष्णिक विज केंद्रातील अधिकाऱ्यांना कार पुरवठा करण्याचे कंत्राट मंशा ट्रेडर्स या कंपनीला देण्यात आले आहे रात्रीच्या सुमारास सदर ट्रेडर्स कंपनीच्या कार सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सौदामिनी कार्यालय परिसरात उभ्या करण्यात येतात मात्र त्यांच्या दोन स्टेपन्या चोरी गेल्याचे ट्रेडर्स कंपनीच्या संचालकाच्या लक्षात आले मात्र त्यांनी या संदर्भात पोलिसांत तक्रार केली नसल्याची माहिती मिळाली आहे सदर विज केंद्रात यापूर्वी डिझेल चोरीसह अनेक घटना चोरीच्या घटना घडल्या आहेत विज केंद्र राष्ट्रीय प्रकल्प असल्यामुळे मोठया प्रमाणात सुरक्षा तैनात करण्यात आली आहे एवढ्या मोठया प्रमाणात सुरक्षा व्यवस्था असतांना चोऱ्या होतात कश्या? असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात मंशा ट्रेडर्सचे संचालक अनिल भोयर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी यासंदर्भातील माहिती कंत्राटदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिली असल्याचे सांगून पोलिसात तक्रार दिली नसल्याचे सांगितले.
खापरखेडा औष्णिक विज केंद्राचे मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून चिपळे तैनात असून संपूर्ण विज केंद्र परिसराची सुरक्षा त्यांच्या अखत्यारित आहेत सदर विज केंद्रात दारू, मटण, चिकन आदि पार्ट्या सारख्या सुरू असतात तासंदर्भात मध्यल्या काळात मुख्य अभियंता यांनी स्वतः चौकाशी केल्या असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे विज केंद्रात मोठया प्रमाणात सुरक्षा असतांना चोऱ्या होत असल्यामुळे चोरट्यांचे चांगलेच फावत आहे विज केंद्राचे मुख्य सुरक्षा अधिकारी म्हणून चिपळे यांची जबाबदारी असतांना त्यांचे अधिकतर कार्य उपसुरक्षा अधिकारी राठोड बजावत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.