Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, डिसेंबर १६, २०१९

ख्रिसमसच्या शालेय सुट्यांमधील निवडणूक प्रशिक्षणाचे तारखेत बदल करा




कामठी- आगामी जिप व पंस निवडणूक प्रशिक्षणाच्या तारखेत बदल करण्याची मागणी करणारे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक व शिक्षकेतर सेनेचे तालुका अध्यक्ष नंदकिशोर उजवणे यांच्या नेतृत्वात कामठीचे तहसीलदार अरविंद हिंगे यांना देण्यात आले.
तालुक्यातील शिक्षकांचे दुसरे प्रशिक्षण ख्रिसमसच्या सुट्यांमध्ये 27 डिसेंबरला आयोजित करण्यात आले आहे.



परंतु जिपचे प्राथमिक शिक्षण विभागाने 25 ते 28 डिसेंबरला रोजी ख्रिसमसच्या सुट्या घोषित केल्या असून दि.29 रोजी रविवार असल्याने याकाळात शिक्षकांनी पर्यटन व इतर कार्यक्रमाचे नियोजन, प्रवास व निवासाचे आगाऊ आरक्षण  केलेले असल्यामुळे दि. 27 डिसेंबरचे दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण स्थगित करून सुट्यांपूर्वी किंवा सुट्यानंतर प्रशिक्षणाचे आयोजन करण्याची मागणी करण्यात आली असून तहसीलदार अरविंद हिंगे यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे ठोस आश्वासन दिले.
शिष्टमंडळात सर्वश्री नंदकिशोर उजवणे, नारायण पेठे, सुनिल नासरे, कमलाकर हटवार, राजेंद्र वैद्य, राजु आंबिलकर, भास्कर उराडे, सुदाम बोकड यांचेसह इतर संघटनांचे विठ्ठल जिचकार, दशरथ मोरे, सतीश राऊत, मनोहर माटे, ऋग्वेद भांडारकर, चंद्रशेखर भांगे, जयंत बन्सोड,  बोराडे, गुरूकार, ठवरे व इतर शिक्षक उपस्थित होते.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.