येवल्यातील विंचूर चौफुलीवर दोन सराईत गुन्हेगारांना अटक
येवला प्रतिनिधी/ विजय खैरनार
नाशिक जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था परिस्थिती वर नियंत्रण तसेच गुन्हेगारीस प्रतिबंध होणे साठी नासिक ग्रामीण जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक डॉ आरतीसिंग यांनी तत्पर कारवाई चे आदेश दिलेले असतानात्या नुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटिल यांचे पथकाने आज (दि. 18/12/2019) रोजी येवला शहरातील विंचूर चौफुली परिसरात सापळा रचून अहमदनगर जिल्ह्यातील दोन सराईत गुन्हेगारांना 3 गवठी पिस्तुल, 26 जिवंत काडतुसे, 4 मागेझिन अशा घातक शस्रांसह ताब्यात घेतले आहे. आज, सकाळच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक न उघड झालेल्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी येवला तालुका परिसरात गस्त घालत होते. दरम्यान, पोलीस निरीक्षक पाटील यांना खबऱ्यां मार्फत मिळालेल्या गुप्त माहितीनुसार नगर जिल्ह्यातील काही सराईत गुन्हेगार घातक शस्र बाळगून धुळ्याकडून नगर कडे जाणार असल्याची बातमी मिळाली त्या नुसार स्थनिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी कर्मचारी यांनी येवला शहरातील विंचुर चौफुली परिसरात सापळा रचून येवला शहराच्या दिशेने येत असलेली सफेद रंगाची ह्युंदयी क्रेटा कार अडवली. सदर वाहना वरील चालक व एक संशियतास ताब्यात घेण्यात आले.दिनेश ज्ञान देव आळकुटे वय. 30, रा.पाईपलाईन रोड,सावेडी,जि.अहमदनगर, सागर मुरलीधर जाधव,वय21,रा. ब्राह्मणी ता. राहुरी जि.अहमदनगर यांच्या कार ची झडती घेतली असता त्यांच्या ताब्यातुन3 गावठी पिस्तूल,26,जिवंत काडतुस,4मँगझीन असे घातक शस्र तसेच मोबाईल फोन ,कार क्र.MH 16-BH-8380असा एकुण दहा लाख 87हजार रू.किमतीचा मुद्दे माल पोलिसांनी जप्त केला असुन त्यांच्या विरुद्ध येवला शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा कलम3/