- भाजप पदाधिकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज
- अश्लील भाषेचा वापर करणारे समाजासाठी धोकादायक
सावनेर/ सुनील जालंधर
परिसरातील सिल्लेवाडा ग्रामपंचायत येथील बसपाच्या सरपंच प्रमिला बागडे यांना उद्देशून ग्रामपंचायत सदस्य अनिल तंबाखे यांनी जाहीर सभेतून सार्वजनिक ठिकाणी अश्लील भाष्य केले शिवाय त्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायलर केला अश्लील भाषेचा वापर झाल्यामुळे चारही बाजूनी भाजप नेते व त्यांच्या कार्यकर्त्यांवर टिकेची झोड उठली मात्र अनिल तंबाखे यांना समज न देता त्यांच्या वक्तव्यावर टाळ्या वाजविणाऱ्या नेत्यांवर कार्यवाही कोण करणार? असा प्रश्न महिला वर्गातून समोर येत असून निषेध व्यक्त करण्यात येत आहे देशात मोजके राज्य सोडले तर संपूर्ण देशात भाजप मित्र पक्षाची सत्ता आहे सर्व सामान्य जनतेला त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे मात्र एका दलित सरपंच महिलेचा सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्दांचा वापर करून तिचा अपमान करने न्यायसंगत नाही त्यामुळे नागपूर ग्रामिण भाजपच्या नेत्यांवर आत्म-परिक्षण करण्याची वेळ निर्माण झाली आहे भारत देशात संस्कृती आहे महिलांची अब्रू व तिचे रक्षण करने आपल्या आपल्या सर्वांची जबाबदारी आहे अश्लील भाषेचा वापर हा समाजासाठी धोकादायक बाब आहे लोकशाहीत आरोप-प्रत्यारोप चालणार मात्र जिवनातून उठविने योग्य नाही मागील काही दिवसांपासून सिल्लेवाडा परिसरात स्टार शहर बस सेवा उदघाटनाच्या नावावर राजकारण केले जात आहे स्टार शहर बस सेवेचे उदघाटक कांग्रेसचे आ सुनील केदार यांनी आपल्या भाषणातून धमकी दिल्याचे व्हिडिओ व्हायलर झालेत यासंदर्भात जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार यांच्या तक्रारीवरून आ केदारावर अदाखल पात्र गुन्ह्याची नोंद झाली समाजात अस्तिरता व द्वेष निर्माण करणाऱ्या नेत्यांवर कार्यवाही अपेक्षित आहे हे खरे आहे मात्र भाजपचे नेते काही धुतल्या तांदळा सारखे आहेत का हा विचार सुद्धा करने गरजेचे आहे भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या झेंडा लगाओ अभियाना दरम्यान झालेल्या जाहीर सभेत एक नव्हे तर अनेक नेत्यांनी धमकी वजा भाषणे केलीत, त्यांचे काय केलं? त्यांना पाठीशी घालण्या मागचा उद्देश कोणता? असे अनेक प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना भेडसावत आहे आ सुनील केदाराचा धमकीभरा व्हिडीओ व्हायलर होताच 14 सप्टेंबर शनिवार ला सिल्लेवाडा परिसरात भाजपने झेंडे लावण्याचा अभियान राबविले यावेळी झालेल्या जाहीर सभेत आ गिरीश व्यास, जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार, श्रीकांत देशपांडे, संजय टेकाडे, रमेश मानकर, दादा मंगळे, सोनबा मुसळे, नितीन राठी, लक्ष्मण पंडागळे, अशोक तांदूळकर, अनिल तंबाखे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी बसपाच्या सरपंच प्रमिला बागडे यांना उद्देशून ग्रामपंचायत सदस्य अनिल तंबाखे यांनी आपल्या भाषणातून अश्लील भाष्य केले शिवाय मंचावरून माजी जि. प.उपाध्यक्ष नितीन राठी यांनी धमकी देणाऱ्यांना जेसीपी मशीनने खड्डा खोदून गाडण्याची धमकी दिली अश्लील भाष्य केल्यामुळे अनिल तंबाखे यांचेवर खापरखेडा ठाण्यात विविध कलमांसह गुन्हे दाखल करण्यात आले एका दलित महिला सरपंचा विरुद्ध अश्लील भाषेचा वापर भाजपच्या सभेतून करण्यात आला सदर प्रकरण अंगलट येण्याची चिन्हे दिसत असल्यामुळे भाजपच्या संस्कृतीचा हवाला देत रविवारी रात्री उशिरा ग्रामपंचायत सदस्य अनिल तंबाखे यांना पक्षातून निलंबित करण्यात आले मात्र मंचावर बसून टाळ्या वाजविणाऱ्या व धमक्या देण्याऱ्या नेत्यांवर कोणती कार्यवाही करणार? असे प्रश्न निर्माण होत आहे यासंदर्भात सोशल मिडिया वरून सदर नेत्यांवर मोठया प्रमाणात टिकेची झोड उठत त्यांना निलंबित करण्याची मागणी समोर येत आहे तेव्हा जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार कार्यवाही करणार किंवा नैतिक जबाबदारी समजून राजीनामा देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.