विविध मागण्यांना घेऊन आयटक संघटनेने वित्त व नियोजन मंत्री तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरावर भर पावसात मोर्चा काढला.
आशा स्वयंसेवकांना कामावर आधारीत मोबदला धरुन सध्या २५०० रुपये सरासरी दरमहा मानधन मिळते. तर गटप्रवर्तकांना टि.ए.डी.ए.म्हणून मासिक आठ हजार सातशे २५ रुपये मिळतात. हे मानधन अत्यंत अल्प आहे.गटप्रवर्तक व आशा स्वयंसेवकांना शासकिय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, अशी कृती समितीची मागणी आहे.
गटप्रवर्तक व आशा स्वयंसेवकांना मिळणारे मानधन हे दारिद्रय रेषेखालील व किमान वेतनाखालील असून त्यांना वेठबिगारी सारखे वागविले जाते. गटप्रवर्तक व आशा स्वयंसेवकांना शासकिय सेवेत कायम करे पर्यंत अंगणवाडी सेविकेऐवढे तरी मानधन मिळाले पाहीजे, अशी त्यांची मागणी आहे.
या संदर्भात मुंबई मंत्रालयात चर्चा झाली.तसेच आरोग्य मंत्री एकनाथजी शिंदे यांचे बरोबर चर्चा झाली होती.त्यांनी आशा स्वयंसेवकांचे व गटप्रवर्तकांचे अडीच ते तिन पट मानधन वाढविण्याचे आश्वासन दिले होते.
मात्र अजूनही मानधनात वाढ न झाल्याने आयटक संघटनेने वित्त व नियोजन मंत्री तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या घरावर भर पावसात मोर्चा काढला.यावेळी शेकडोच्या संख्येने आशा स्वयंसेवकांचा समावेश होता.