नागपूर/प्रतिनिधी:
राज्यात गाजत असलेल्या कडकनाथ कोंबडी फसवणूक प्रकरणात १ नव्हे २ नव्हे तर तब्बल 600 तक्रारी दाखल करण्यात आले असल्याची एका प्रसिद्ध वृत्तपत्रातून देण्यात आली आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान आणि छत्तीसगडपर्यंत पसरलेल्या कडकनाथ कोंबडी फसवणूक प्रकरणात तब्बल 600 तक्रार अर्ज आले आहेत. कंपनीचे पदाधिकारी सुधीर शंकर मोहिते आणि संदीप सुभाष मोहिते (दोघेही, रा. इस्लामपूर, जि. सांगली) यांच्यावर शाहूपुरी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. कंपनीचे आर्थिक व्यवहार, शेतकरी आणि व्यावसायिकांबरोबर केलेल्या करारांची चौकशी सुरू आहे.
देशातील नंबर १ चे पोल्ट्रीफीड |
या कंपनीने विदर्भातील चंद्रपूर,नागपूर,यवतमाळ,अमरावती यासह अनेक ठिकाणी आमिष दाखवून फसवणूक केली असल्याचे समोर आले आहे.
इस्लामपूर केंद्रस्थान असलेल्या कडकनाथ कोंबडी प्रकरणात तक्रारदारांची संख्या रोज वाढत आहे. लाखो रुपयांची फसवणूक झालेले काही हजार लोक आहेत. यात कोट्यावधी रुपयांची फसणवूक झाली आहे. आता या कोंबडीचे करायचे काय? कोंबडी खाद्य संपले आहे. अंडीला ग्राहक नाही. कार्यालयांना टाळे आहे. गुंतवलेले पैसे बुडणार, अशी भिती आहे. त्यामुळे काही हजारो शेतकरी तरुण अस्वस्थ आहेत. त्यांनी आपले तक्रार अर्ज पोलिसांत दाखल करण्यास सुरवात केली आहे.
देशातील नंबर १ चे पोल्ट्रीफीड
या प्रकरणात राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर आरोप केला जात असल्याचा आरोप केला जात आहे.तर दुसरीकडे सोमवारी महारयत ऐंग्रो कपनीवर कडकनाथ कोंबडीपालन प्रकल्पाच्या बहाण्याने व्यावसायिकांची चार कोटी रुपयांची फसवणूक केली असल्याला आरोप आहे. या प्रकरणी कंपनीवर गुन्हा दाखल झाला असून तपास सुरू आहे. आज यामध्ये शाहूपुरी पोलिसांनी कंपनीची दोन खाती गोठवली. यामध्ये सुमारे एक कोटीची रक्कम होती. त्यांच्या अन्य खात्यांची चौकशीही सुरू आहे.
देशातील नंबर १ चे पोल्ट्रीफीड |
एका खात्यावरील 30 लाख 95 हजार रुपये, तर दुसऱ्या खात्यावरील 63 लाख 57 हजार रुपयांची रक्कम शिल्लक आहे. पोलिसांनी बँक अधिकाऱ्यांशी चर्चा करून दोन्ही खाती गोठवली. कंपनीची अन्य बँकांमध्येही खाती असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. संशयित सर्व बँक खात्यांची चौकशी केली जाणार आहे.
साभार:सकाळ