Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

शुक्रवार, ऑगस्ट ०२, २०१९

नगराध्यक्षांसह भाजपाचे नेते काढतात चिखलातून वाट

  • पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या स्मार्ट सिटीतील पदाधिका-यांचा प्रभाग विकासापासून कोसोदूर



मूल/प्रतिनिधी 
 राज्याचे वित्तमंत्री आणि जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे ग्रुहक्षेत्र असलेल्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मूल षहरात कोटयावधीची विकासकामे होत असुन षहर स्मार्टसिटीकडे वाटचाल करीत असल्याचे चित्र रंगविल्या जात असतांना प्रभाग क्रमांक 5 मधील नागरीकांना आपल्या मुलभुत सोई-सुविधांपासुन वंचीत राहावे लागत असल्याचे चित्र आहे.
मागील अनेक वर्शापासुन रस्ते,नाल्या,पथदिव्यांची सोय होऊ न षकलेल्या या प्रभागातील जनतेने अडीच वर्शापुर्वी याच प्रभागातील रहीवासी असलेल्या रत्नमाला भोयर यांना नगराध्यक्षपदी आणि नगर सेवकाच्या दोन्ही जागांवरील भाजपाचा उमेदवारांना निवडुन दिले. नगर परिशदेतील कॉंग्रेस राजवटीत विकासापासुन वंचीत राहीलेल्या या प्रभागातील नागरीकांनी भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या अजेंडावर विष्वास ठेवुन त्या पक्षाच्या उमेदवारांना नगर परिशदेचा कारभार हाकण्यासाठी निवडुन दिले. परंतु निवडुन दिलेले प्रतीनिधी अगदी निश्क्रीय निधाल्याचे दुःख या प्रभागातील नागरीकांच्या चेहÚयांवर पहावयास मिळत आहे.
जिल्हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार देषविदेष भ्रमण करीत असल्याने त्यांनाही आपला ग्रुहक्षेत्र विदेषातील स्मार्ट षहरांप्रमाणे बनविण्याची उर्मी आली आहे. बोले तैसा चाले या उक्तीचे मुर्तिमंत उदाहरण असलेल्या मुनगंटीवारांनी बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मूल षहराला स्मार्ट बनविण्याचे जणु चंग बांधले आहे. त्याद्रुश्टीने तालुक्याचे ठिकाण असलेल्या मूल षहरातील षासकीय कार्यालयांच्या सुषोभित ईमारती सांबतच षहरात कोटयावधींचे विकासकामे केली जात आहे. त्यांच्याच स्थानिक षिलेदारांकडे असलेल्या मूल नगर परिशदेला षहरातील रस्ते,नाल्या,दिवाबत्ती आदी मुलभुत सोयींचे अनुषेश भरून काढण्यासाठीही मोठयाप्रमाणात षासननिधी उपलब्ध करून देत आहे. मात्र कुटील प्रव्रुत्तीच्या काही पदाधिकाÚयांमुळे मुनगंटीवारांच्या स्वप्नहेतुला हरताळ फासल्या जात आहे. नगर परिशदेकडे येणाÚया निधीतुन आणि सार्वजीनक बांधकाम विभागाच्या मार्फतीने मूल षहराच्या कायापालट करण्याची पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांची योजना आहे. परंतु  निधी मिळुनही मूल शहरात विकासाबाबत असमतोल दिसुन येतो. कुटील प्रव्रुत्ती आणि वजनदारपणा असलेले पदाधिकारी आपल्या प्रभागातील त्याच त्या कामावर निधी खर्च करण्याच्या आग्रह धरून प्रषासनाला वेठीस धरतात. यामुळे षहरातील अनेक भागात विकासाची गंगोत्री अदयापही पोहचु षकली नाही त्यातील प्रभाग क्रमांक 5 च्या समावेष होतो.
षहरातील उच्चभ्रु लोकांची वस्ती म्हणुन ओळखल्या जाणाÚया प्रभाग क्रमांक 5 मधील वस्तीमध्ये नगर परिशदेच्या अध्यक्षा रत्नमाला भोयर, भाजपाचे मूल षहर अध्यक्ष आणि दिग्गज कंत्राटदार प्रभाकर भोयर, मूल षहर सरचिटणीस आणि नगर परिशदेचे सल्लागार स्विक्रुत सदस्य चंद्रकात आश्टनकर असे अनेक पदाधिका-यांचे निवासस्थान आहे. यापदाधिका-यांचे निवासस्थान असलेला भाग वगळता ईतरत्र मात्र रस्ते,नाल्या,पथदिव्यांची वानवा आहे. या प्रभागातील नागरीक गेलया अनेक वर्शापासुन पावसाळयाच्या दिवसात चिखलातून वाट तुडवित आपले जीवन जगत आहे. पालकमंत्री मुनगंटीवारांच्या स्वप्नातील स्मार्टसिटीकडे वाटचाल करणा-या मूल शहरातील विकासाची ही वास्तवस्थिती दर्षविणारी चित्र लवकरच भुतकाळात जावी अषी अपेक्षा प्रभाग क्रमांक 5 मधील नगरीक करीत आहे.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.