चंद्रपूर/प्रतिनिधी:
आज दिनांक ०६ ऑगस्ट, २०१९ रोजी दुपारी १२.३० वाजता चंद्रपूर शहर मनपाचे महापौर सौ. अंजली घोटेकर यांचे अध्यक्षतेखाली व मनपा आयुक्त श्री संजय काकडे यांची उपस्थितीत स्थायी समिती सभागृहात शांतीधाम स्मशान भूमी विकासाबाबत बैठक घेण्यात आली. या बैठकीस शांतीधाम विकसित करण्याकरिता विशेष मुद्यांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली असता प्राथमिक स्वरूपात शांतीधाम परिसरातील साफ - सफाई नियमित प्रमाणे दिवसातून २ वेळा करणे. फॉगिंग व फवारणी करणे, रस्ते विकसित करणे, नाली बनविणे, व पूर्ण परिसरात सौंदर्यीकरण करणे, बोलक्या भिंती पेंटिंग करणे, प्रवेशद्वार पेंटिंग करणे, पिंडदाना करिता व्यवस्था करणे, रेन वाटर हार्वेस्टिंग करणे, परिसरात पेव्हर ब्लॉक लावणे, देखरेख करिता चौकीदारची व्यवस्था करणे, विहिरी ची साफ सफाई करण्यात आली आहेत. मनपाद्वारे ट्यूबवेल करून दिली आहे.
अशी महत्वपूर्ण बाबीवर चर्चा शांतीधाम स्मशान भूमी, चंद्रपूर विकास समन्वय समितीच्या बैठकीत करण्यात आली.
या प्रसंगी शांतीधाम स्मशान भूमी, चंद्रपूर विकास समन्वय समितीचे श्री अशोक वासलवार, श्री रमेश मामीडवार, श्री घनश्यामसिंह दरवार, श्री जितेंद्र दोशी, मनपा उपअभियंता श्री अनिल घुमडे, मुख्य स्वच्छता निरीक्षक श्री संतोष गर्गेलवार प्रामुख्याने उपस्थित होते.