Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, ऑगस्ट ०६, २०१९

चंद्रपुर;ईरई नदीत कारसह युवक गेला वाहून

वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे युवकाला पडले महागात 
चंद्रपुर/ललित लांजेवार:
वाहत्या पाण्यातून गाडी टाकणे एका युवकाला चांगलेच महागात पडले आहे.
डयूटी आटोपुन घरी जात असतांना पाणी असलेल्या पुलावरुन गाड़ी टाकली आणि गाडी सोबतच युवक वाहुन गेल्याची घटना चंद्रपूर शहराजवळील भटाळी-दुर्गापूर मार्गावर घडली.



सूरज बिपटे असे मृत युवकाचे नाव आहे. मृत युवक भटाळी येथील कोळसा खाणीत कर्मचारी आहे. नुकताच हा युवक खान कर्मचारी म्हणून लागला होता.

मंगळवारी सकाळी शिफ्ट संपल्यावर आपल्या घराकडे येण्यासाठी हा युवक कारने निघाला होता.भटाळी गावाजवळील नदीवरील या पुलाची उंची अतिशय कमी आहे. मागील तीन दिवसांपासून ईरई धरणाचे सातही दरवाजे उघडले कारणाने पाण्याचा प्रवाह या पुलावरून सतत सुरू होता. अशातच या  युवकने वाहत्या पाण्यातून कार टाकण्याचा प्रयत्न केला आणि तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला.



-- या घटनेची माहिती प्रशासनाला होताच शोधमोहीम पथकाने घटनास्थळ गाठून शोधमोहीम सुरु केली .
अगोदरच प्रशासनाने ईरई धरणाचे सातही दरवाजे खोलण्या पूर्वी परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा दिला होता.



बातमी लिहेपर्यंत या युवकाचा शोध सुरूच होता.मिळालेल्या माहिती नुसार हा युवक अजूनही कारमध्येच असल्याचे सांगितले जात आहे.




SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.