नागपूर/ललित लांजेवार:
संततधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे नदी नाले, तुडुंब भरून वाहत आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील नागभीड-नागपूर मार्गावरील नागभीड पासून काही अंतरावर असलेल्या बाम्हणी गावाला पुराचा फटका बसला.
या गावानजीक असलेल्या बाम्हणी,गावाजवळच असलेला मामा तलाव फुटल्याने कुनघाडा,मोहाडी मोकासा या गावात तलावाचे पाणी शिरले हि तलावाची पाळ पहाटे फुटल्याने या तिन्ही गावात पाणी शिरले,आणि शेत्या देखील पुराच्या पाण्याखाली आल्या.
बाम्हणी येथे गावात घरा घरात पुराचे पाणी घुसल्याने खूप नुकसान झाले , अन्यधान्य व दैनंदिन जीवनावश्यक वस्तूचे यात नुकसान झाले,वीज बंद करण्यात आली.
तर नागरिक सकाळ पासून उपाशी होते,ह्या घटनेची माहिती मिळताच
चिमूर विधानसभा क्षेत्राचे नेते तथा जि. प.गट नेता डॉ.सतिश वारजूकर यांचे कडून गावकऱ्यांना आलुभात पोहचवत गावाची पाहणी केली.
रस्त्याच्या दोन्ही बाजूने पाणी वाहत होते,पाण्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
चिमूर तालुक्यातील मासळ ते पळसगाव रस्तावर वरील गावालगत असलेल्या (डोडा) यापुलाला वरील गेल्या काही दिवसापासून नदीचे स्वरूप आले आहे. या रस्त्याने चिमूर शिंदेवाही येथे शिक्षणासाठी येथील रोज अनेक विद्यार्थी शिक्षणाकरिता तर परिसरातील नागरिक शासकीय कामा करिता जातात. पळसगाव या मार्गाची गेल्या अनेक दिवसांपासून बिकट अवस्था झाली असून, या मार्गावर मोठया प्रमाणात पुलावरती खडयाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.