चार दिवसांपासून कोसळणऱ्या संततधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.शनिवारी मूल तालुक्यातील चीचाळा गावालगत पूर आल्याने सकाळच्या सुमारास शेतात काम करण्यासाठी गेलेल्या भाऊजी गुरूनूले वय वर्ष 84 हे पुराच्या पाण्यात अडकले . ह्या घटनेची माहिती गावकरांनी मूलचे पोलीस निरीक्षक मुरलीधर कासार यांना दिली.
परिस्थितीचे गांभीर्य बघत ठाणेदार कासार यांनी लगेच चंद्रपूर जिल्हा पुलिस आपत्ति व्यावस्थाप कक्ष ल माहिती दिली व लगेच चंद्रपूर पोलीस आपत्ती टीम चे टीम चे कर्मचारी अशोक गरगेलवार, समीर चापले, दिलीप चव्हाण, उमेश बनकर , वामन नाक्षीने, गिरीश मरापे , मेकाशाम गायकवाड, मूल पुलिस स्टेशनचे पुलिस कांस्टेबल राजेश शेंडे यांनी त्यांना सुखरूप त्या पुराच्या पाण्यातून वाचवण्याचे काम केले.