नागपुर :- जिल्ह्यातील पीकविमा संदर्भात शिवसेनेचे सम्पूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे या अनुषंगाने हिंगणा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीकविमा संदर्भात शिवसेनेचे जिल्हा संघटक प्रदीप ठाकरे यांनी हिंगणा तालुका तहसीलदार संतोष खांडरे तसेच तालुका कृषी अधिकारी महेश परांजपे याच्या सह चर्चा केली यात प्रामुख्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीकविमा संदर्भात चर्चा करण्यात आली या शिवाय शेतकऱ्यांना मिळणाऱ्या इतर योजनावरही चर्चा करण्यात आल्या. बजाज अलायन्स कंपनीच्या माध्यमातून ज्या बँकांच्या माध्यमातुन पीकविमा हप्त्यांच्या कपाती झाल्या आहेत.त्या बँकांन कडून तालुक्याचे सहकारी सहाय्यक निबंधक कार्यालयातून चैतन्य नासरे यांचे मार्फत याद्या मागवून त्या सम्बंधित शेतकऱ्या पर्यंत पोहचवून त्यांना न्याय मिळवून देण्याचा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशा नुसार शेतकरी बांधवांसाठी धडक अभियान शिवसेनेचे जिल्हा संघटक प्रदिप ठाकरे यांच्या नेतृत्वात राबविण्यात येत आहे.
लाभापासून वंचित शेतकऱ्यांना न्याय मिळे पर्यंत सदर अभियान सुरूच राहील सुरवातीच्या पहिल्या टप्प्यात कान्होलीबारा परिमंडळाचा दौरा आज पासून सुरू करण्यात येत आहे.
*या वेळी सुनील निंबुलकर, दशरथ कारेमोरे, अभिनव पांडे, निखिल पिंपळे, विवेक गावंडे इत्यादी उपस्थित होते.