नागपूर/प्रतिनिधी:
सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांच्या विविध तक्रारींचे जलदगतीने निवारण व्हावे तसेच वीजग्राहकांशी थेट संवाद साधून अपेक्षा, अडचणी जाणून घेत त्यांना महावितरणच्या विविध ग्राहकसेवा अवगत करून देण्यासाठी नागपूर ग्रामीण भागात येणाऱ्या सर्व उपविभागातील कार्यालयांमध्ये उद्या दिनांक २३ जुलै पासून वीजग्राहक मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार आहे. या मेळाव्यात शाखा अभियंत्यापासून मुख्य अभियंता जातीने उपस्थित राहून वीज ग्राहकांच्या समस्या जाणून घेणार आहेत.
नागपूर जिल्ह्यातील सावनेर आणि मौदा या विभागांतर्गत असलेल्या सर्व उपविभागिय कार्यालयांमध्ये 23 जुलै पासून दुपारी 12 ते 3 वाजेदरम्यान वीजग्राहक मेळाव्यांचे आयोजन करण्यात येईल. संबंधीत विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी स्वत: ग्राहकांच्या नवीन वीजजोडणी, वीजबील दुरुस्ती आदींसह वीजसेवेशी संबंधीत तक्रारी दाखल करून घेतील आणि त्या सोडविण्यासाठी तात्काळ कार्यवाही करतील. वीजग्राहकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
मौदा विभागात २३ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत एकूण २५ वीज ग्राहकः मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती मौदा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित परांजपे यांनी दिली या अंतर्गत कामठी उपविभागातील दिनांक २४ रोजी खसाळा, दिनांक २६ रोजी कामठी, कन्हान उपविभागात दिनांक २३ रोजी कन्हान येथे, २५ जुलै रोजी गोंडेगाव, रामटेक उपविभागात नगरधन येथे २५ जुलै रोजी, चाचेर ग्राम पंचायत येथे २५ जुलै, कोदामेंढी २० जुलै, खात ग्राम पंचायत येथे ३१ जुलै, घोटीठोक येथे २ ऑगस्ट, रामटेक येथे ३ ऑगस्ट, मौदा उपविभागात वरंभा ग्राम पंचायत येथे २३ जुलै रोजी दुपारी ११ ते २ या वेळेत ,चिकना ग्रापं पंचायत येथे २४ जुलै रोजी, जातेगाव येथे २७ जुलै रोजी, मौदा येथे २७ जुलै रोजी वीज ग्राहकांचा मेळावा होईल.
सावनेर विभागात येणाऱ्या कळमेश्वर येथील धापेवाडा येथे २३ जुलै रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत, गोंड खैरी येथे २६ जुलै रोजी दुपारी २ ते ४ वेळेत, पारशिवनी उपविभातील पारशिवनी येथे २९ जुलै रोजी दुपारी १२ ते ३ वेळेत ,मोहपा येथे २ ते ५ या वेळेत २४ जुलै रोजी, खापा उपविभागातील बडेगाव येथे २४ जुलै रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत, पाटणसावंगी येथे सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत दिनांक २३ जुलै रोजी, कोरडी येथे २५ जुलै रोजी सकाळी ११ ते ३ या वेळेत , धनेगाव येथे सकाळी ११ ते ३ या वेळात २६ जुलै रोजी, उमरी येथे २३ जुलै रोजी सकाळी ११ ते ३ या वेळेत , नांदा येथे २३ जुलै रोजी, मालेगाव येथे २९ जुलै रोजी सकाळची ११ ते ३ या वेळेत, केळवाद येथे १ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत , सावनेर ग्रामीण भागात ३ ऑगस्ट रोजी ११ ते ३ या वेळेत वीज ग्राहकांच्या तक्रारी स्वीकारल्या जातील. अशी माहिती कार्यकारी अभियंता कुलदीप भस्मे यांनी दिली.