Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

मंगळवार, जुलै २३, २०१९

रेवीगो वेअरहाऊसच्या गॅरेजमध्ये टायर फुटल्याने तरुण कामगाराचा बळी प्रशासनाचे दुर्लक्ष

नागपूर/प्रतिनिधी:



नागपूर अमरावती महामार्गावरील गोंडखैरी परिसरातील पाल पेट्रोल पंप जवळच्या रेवीगो वेअरहाऊसच्या (टिव्हीएस जेके टायर) गॅरेजमध्ये टायर फुटल्याने, काम करीत असलेल्या तरुण मजुराचा दुर्दैवी मृत्यू झाला.  ही घटना मंगळवार २३ जुलै रोजी सकाळी ८ वाजताच्या सुमारास गोंडखैरी परिसरात घडली. पुष्पेंद्र खरगेंद्र कुर्मी वय २४ राहणार भैसा ,तालुका हटा, जिल्हा दमुह (मध्य प्रदेश) असे मृतक कामगाराचे नाव असून तो गोंडखैरीत किरायाने राहतो.

       प्राप्त माहितीनुसार मृतक पुष्पेंद्र कुर्मी हा रेवीगो वेअरहाऊसचा कामगार असून नेहमीप्रमाणे आपल्या जावई शशीकांत जमुनाप्रसाद कुर्मी यांचे सोबत  सकाळी कामावर यायचा. रेवीगो वेअरहाऊस गॕरेज असल्याने मोठमोठया कंपनीच्या ट्रक, बससह अन्य वाहन दुरुस्ती करते. वाहन दुरुस्तीसह नवीन टायर बदलविण्याचे काम करताना प्रशासनाने कोणतीही सेप्टी सुरक्षा बेल्ट न दिल्याने ट्रकचे नवीन टायर बदलवून त्यात हवा भरीत असताना अचानक टायरमधील ट्युब फुटल्यानी हवेसह टायर डिक्सची लोखंडी रींग त्याच्या डोक्याला लागून गंभीर जखमी केले. लोखंडी रिंगचा हवेमध्ये उडण्याचा वेग एवढा होता की, उंच हवेत अठरा ते विस फुट उंच उडाली असून  विस फुटावरील लोखंडी पत्र्याचे शेडला छिद्र पडले. पाहताक्षणी पुष्पेंद्र कोणतीही हालचल न करता त्यांचेवर काळाने झडप घातली.  

   रेवीगो वेअरहाऊस गॅरेजमध्ये जोराचा आवाज झाल्याने विलंब न करता कामगारांनी मदतीची धाव घेतली.परंतु पुष्पेंद्रच्या डोक्याला गंभीर दुखापतीने रक्तबंबाळ होऊन डोक्यातील मासाचे तुकडे अस्तव्यस्त पडलेल्या अवस्थेत पडले होते, परिसरात जोराचा आवाज आल्यानी बघ्याची गर्दी वाढू लागली. अगर मृतक पुष्पेंद्रला सुरक्षा सेप्टी बेल्ट वापरण्यास दिला असता तर कदाचित पुष्पेंद्रचा प्राण वाचला असता अशी माहीती यावेळी जावई शशीकांत कुर्मी सह अन्य  कामगारांकडून चर्चेत प्राप्त झाली. रेवीगो वेअरहाऊस (टिव्हीएस जेके टायर) गॅरेजचे सुपरवायजर यांनी कळमेश्वर पोलीसांना माहीती दिली. कळमेश्वर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामादरम्यान मृत्यूची नोंद करुन मृतकाला उत्तरीय तपासणीकरीता कळमेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

 पुढील तपास पोलीस निरिक्षक मारुती मुळूक यांंच्या मार्गदर्शनात साय्यक पोलीस उपनिरिक्षक मोरेश्वर नागपूरे, हेडकाँस्टेबल राजेंद्र काकडे, दाऊद मोहम्मद, रवी मेश्राम तपास करीत आहे.


SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.