Top News

सरकारी शाळा बंद करण्याचा निर्णय त्वरित रद्द करा

पुरोगामी पत्रकार संघाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र शिरीष उगे (भद्रावती प्रतिनिधी) भद्रावती : राज्य शासनाने सरकारी शाळेच्या संदर्भ...

ads

सोमवार, जुलै २२, २०१९

महावितरण़चे संचालक दिनेशचंद्र साबू यांनी घेतला कामांचा आढावा

 ग्राहकांना शाश्वत आणि दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी योग्य नियोजन करण्याच्या सुचना
नागपूर/प्रतिनिधी:

चंद्रपूर येथील 33 केव्ही बाबूपेठ उपकेंद्राची पाहणी करतांना संचालक (संचलन) दिनेशचंद्र साबू

ग्राहकांना शाश्वत आणि दर्जेदार वीजपुरवठ्यासाठी देखभाल व दुरुस्तीच्या कार्याचे नियोजन करून त्याची योग्य प्रकारे अंमलबजावनी करण्यासोबतच ट्रीपिंगचे प्रमाण नियंत्रित करण्याच्या सुचना महावितरणचे संचालक (संचलन) दिनेशचंद्र साबू यांनी केले. चंद्रपूर आणि भंडारा मंडलाला दिलेल्या भेटीदरम्यान तेथील संचलन व सुव्यवस्था कामांच्या आढावा बैठकीप्रसंगी ते बोलत होते.


देखभाल व दुरुस्तीच्या निविदांना कंट्राटदारांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्यास त्यापैकी अधिकाधिक कामे बेरोजगार अभियंत्यांना देण्यावर विशेष भर देतांना त्यांनी महावितरणने देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला असल्याने वीजग्राहकांना उत्तमोत्तम सेवा देण्यासाठी त्याचा योग्य वापर करण्यासोबतच पुर्व विदर्भासाठी महावितरणतर्फ़े राबविण्यात येत असलेल्या ‘ईस्ट विदर्भ’ योजनेतील कामे जलदगतिने पुर्ण करा, जिल्हा नियोजन समितीतर्फ़े उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधिचा विनिमय योग्यरित्या करण्याच्या सुचनाही दिनेशचंद्र साबू यांनी यावेळी दिल्या. 

महावितरणकडे मीटरचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने पैसे भरुन प्रलंबित असलेल्या घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक ग्राहकांच्या वीज जोडण्या तत्परतेने द्या, मालमत्तेचे भांडवलीकरण नियमितपणे करा, एमआयडीसी भागातील पायाभुत सुविधांच्या सशक्तिकरणासाठीचे प्रस्ताव त्वरीत पाठविण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या. याबैठकीला त्यांच्यासमवेत नागपूर परिक्षेत्राचे प्रभारी प्रादेशिक संचालक दिलीप घुगल याशिवाय चंद्रपूर येथील बैठकीला चंद्रपूर परिमंडलाचे प्रभारी मुख्य अभियंता हरिश गजबे, अधिक्षक अभियंता सुहास मेत्रे, बोरसे, अशोक मस्के तर भंडारा येथील बैठकीला गोंदीया परिमंडलाचे मुख्य अभियंता सुखदेव शेरकर, अधीक्षक अभियंता सम्राट वाघमारे, ओंकार बारापात्रे यांचेसह सर्व कार्यकारी अभियंते, वरिठ अधिकारी व अभियंते उपस्थित होते.
यावेळी त्यांनी चंद्रपूर येथील 33 केव्ही बाबूपेठ या मॉडेल उपकेंद्राला तर भंडारा येथील विद्युत भवन परिसरात आयपीडीएस योजने जीआयएस तंत्रज्ञानावर आधारीत 33 केव्ही उपकेंद्राल तसेच मुजबी येथील ‘ईस्ट विदर्भ’ योजने अंतर्गत उभारण्यात आलेल्या 33 केव्ही उपकेंद्राला भेट देत तेथील कामाची पाहणी केली. यावेली संचालक (संचलन) आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या उपकेंद्रांच्या परिसरात वृक्षारोपणही करण्यात आले.

औद्योगिक प्रतिनिधींशी चर्चा
महावितरणचे संचालक (संचलन) दिनेशचंद्र साबू यांच्या भंडारा आणि चंद्रपूर भेटीदरम्यान तेथील औद्योगिक ग्राहकांनी त्यांची भेट घेतली यावेळी साबू त्यांचेशी विविध विषयांवर विस्तृत चर्चा करून उद्योगांच्या समस्या जाणून घेत त्यांची त्वरीत सोडवणुक करण्याच्या सुचना सर्व संबंधितांना केल्या.

SHARE THIS

Author:

खबरबात™ (Khabarbat™) हे मराठी माध्यमातील लोकप्रिय वेबपोर्टल आहे. ताज्या बातम्यांसह डिजिटल अपडेट, राजकीय, सामाजिक, पर्यावरण, रोजगार, बिझनेस बातम्या दिल्या जातात. भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याच्या डिजिटल मीडिया विभागाकडे Intermediary Guidelines and Digital Media Ethics Code) Rules 2021 नुसार नोंदणीकृत आहे.